Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोठा जल्लोष केला, ड्रेसिंग रूममध्ये तर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?
मार्कस स्टॉयनीस शूजमध्ये बीयर पिताना

T20 World Cup 2021: आनंद ही एक अशी संकल्पना आहे, जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. विशेष म्हणजे आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते. काहीजण मोठा गाजावाजा करुन आपला आनंद साजरा करतात तर काहीजण अगदी शांत पद्धतीने. पण आनंद साजरा करण्याच्या काही अशाही सवयी किंवा प्रथा आहेत, ज्या थोड्या विचित्र आहेत. अशीच एक पद्धत रविवारी ऑस्ट्रेलियाने टी20 विश्वचषक जिंकल्यावर पाहायला मिळाली. विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी सामन्यादरम्यान त्यांनी घातलेल्या बुटामध्ये पेय टाकून पियाले. तर या विचित्र पद्धतीला शूई असं म्हटलं जात असून (Shoey) अनेक पाश्चिमात्य देशात अशाप्रकारे आनंद साजरा केला जातो.

रविवारी टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला, मात्र फलंदाजांनी ही कसर भरून काढली. फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषक जिंकल्याने विश्वचषक पटकवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. याचवेळी काही खेळाडूंनी आपल्या बुटामध्ये पाणी आणि इतर पेय टाकून पियाले. हा व्हिडीओ आयसीसीसने (ICC) सोशल मीडियावर पोस्ट केला असून प्रचंड प्रमाणात व्हायर होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

हे असं का करतात?

तर अशाप्रकारे बुटातून पेय पिण्याची पद्धत ऑस्ट्रेलियातूनच सुरु झाली. ऑस्ट्रेलियाचा फॉर्मूला वन स्टार डॅनियल रिकियार्डो याने  2016 साली ‘जर्मन ग्रँड प्रिक्स’ मध्ये अशाप्रकारे विजयानंतर बुटातून पेय पित आनंद साजरा केला होता. नंतर नंतर ही प्रथा इतरही देशांमध्ये पसरली. ब्रिटिश रेसिंग ड्रायवर लुइस हेमिल्टननेही ‘एमीलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स’मध्ये विजयानंतर अशाप्रकारे आनंद साजरा केला होता. तर यामागे विजयासाठी आपण जी मेहनत घेतो ती फळाला आल्याचा संदेश खेळाडू देऊ इच्छित असल्याचं सांगण्यात येतं.

आरोग्याला धोका?

अनेक कलाकार किंवा खेळाडू असं करणं पसंद देखील करत नाहीत. सिडनीचीच 21 वर्षीय कॉन्सर्ट फोटोग्राफर जॉर्जिया मौलोनीच्या मते ती हा शूई शब्द खूप जागी ऐकते. पण असं करण अत्यंत विचित्र वाटत असल्यांंचंही तिचं मत आहे. दरम्यान हा प्रकार आरोग्यालाही धोकादायक ठरु शकतो. दरम्यान मेलबर्नच्या मोनाश यूनिव्हर्सिटी इंफेक्शियस डिसीज तज्ज्ञ एंटोन पेलेग यांच्यामते, ‘जर संबधित व्यक्तीचे बूट आतून स्वच्छ असतील. तर असे करण्याने त्रास होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीदेखील असे करणे योग्य नसून कोणतही पेय भांड्यात टाकून पिणंच योग्य आहे.’

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

T20 world cup Final | ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् ठोकले 10 चौकार, 3 षटकार; पराभवानंतरही केनच्या फलंदाजीची चर्चा

New Zealand vs Australia T20 world cup Final Result: वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला, ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता

(Australian players cheer and drink beer in shoe after T20 World Cup victory know why)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI