AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs LSG 2023 : टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतरही नाही सुधरला ‘हा’ खेळाडू, आता IPL मधील करियरही संकटात

RCB vs LSG IPL 2023 : टीमसाठी संकटमोचक ठरण्याऐवजी ओझ ठरतोय. त्यामुळे त्याला चालू आयपीएल सीजनमध्येही बेंचवर बसावं लागू शकतं. आयपीएलमध्ये त्याच्याकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती.

RCB vs LSG 2023 : टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतरही नाही सुधरला 'हा' खेळाडू, आता IPL मधील करियरही संकटात
lsg Team ipl 2023Image Credit source: instagram
| Updated on: Apr 11, 2023 | 9:33 AM
Share

RCB vs LSG IPL 2023 : आयपीएलचा 16 वा सीजन सुरु आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्सच्या टीममध्ये यंदाच्या सीजनमधला 15 वा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून खेळलेला एक बॉलर खूप महागडा ठरला. हा गोलंदाज खोऱ्याने धावा देत असल्यामुळेच त्याला भारतीय टीममधून बाहेर करण्यात आलं. आता आयपीएल 2023 मध्ये हा खेळाडू फ्लॉप ठरताना दिसतोय.

अशा फ्लॉप कामगिरीमुळे त्याचं आयपीएलमधील करियरही संकटात आलय. त्याला पुढच्या काही सामन्यांसाठी कदाचित टीममधून वगळलं जाऊ शकतं.

4 ओव्हरमध्ये दिल्या 53 धावा

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा आवेश खान पूर्णपणे फ्लॉप ठरला. आवेश खान खराब गोलंदाजीमुळे टीम इंडियातून बाहेर गेला. आता आयपीएलमध्ये सुद्धा त्याच्या प्रदर्शनात काही बदल झालेला नाही. आरसीबी विरुद्ध गोलंदाजी करताना आवेश खानने 4 ओव्हर्समध्ये 13.25 च्या इकॉनमीने 53 धावा दिल्या. यात 1 विकेटही त्याला घेता आला नाही.

टीम इंडियाकडून शेवटचा सामना कधी खेळला?

आवेश खान टीम इंडियाकडून आपला शेवटचा सामना ऑक्टोबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. आशिया कप 2022 मध्ये खराब प्रदर्शनानंतर 26 वर्षाच्या आवेश खानला टी 20 टीममधून बाहेर करण्यात आला. त्यानंतर तो भारतीय टी 20 टीममध्ये पुनरागमन करु शकलेला नाही.

हॉन्ग कॉन्ग विरुद्ध 4 ओव्हरमध्ये दिल्या 53 धावा

आशिया कप 2022 मध्ये आवेश खान टीम इंडियाच्या पराभवात सर्वात मोठा विलन ठरला होता. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध 2 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन 1 विकेट काढला होता. त्यानंतर हॉन्ग कॉन्ग विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 13.25 च्या इकॉनमीने 53 धावा देऊन 1 विकेट काढला. टीम इंडियाकडून खेळताना परफॉर्मन्स कसा आहे?

आवेश खान टीम इंडियासाठी आतापर्यंत 15 टी 20 आणि 5 वनडे सामने खेळलाय. टी 20 मध्ये आवेश खानने 9.11 च्या इकॉनमीने 13 विकेट काढलेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर 3 विकेट आहेत. आयपीएल 2022 मधील त्याची कामगिरी लक्षात घेऊन त्याला टीम इंडियात स्थान दिलं होतं. टीम इंडियाकडून खेळताना त्याला प्रभावी कामगिरी जमली नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.