विराट कोहलीने फोटोला Like केल्यानंतर अवनीत कौरने उचललं असं पाऊल
अभिनेत्री अवनीत कौर सध्या चर्चेत आहे. विराट कोहलीकडून एका फोटोला चुकून लाईक झालं आणि तिचं आयुष्य रातोरात बदललं. एका रात्रीत फॉलोअर्सची संख्या तर वाढली. तसेच सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहे. असं असताना अवनीत कौरने पुन्हा एकदा चर्चेत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहली व्यस्त असून आपल्या फलंदाजीने सर्वांचं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे आरसीबीचे चाहते त्याच्या खेळीने खूपच खूश आहेत. मात्र विराट कोहलीकडून चुकून इंस्टाग्रामवर टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला लाईक झालं आणि चर्चांना उधाण आलं. अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. तसेच ट्रोलर्सने ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे अवनीत कौर सोशल मीडियावर व्हायरल झाली. रातोरात तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झाली. असं असताना अवनीत कौर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी अवनीत कौर थेट मैदानात दिसली. अवनीत कौर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी पोहोचली आहे. तिला मैदानात पाहताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काल परवा चुकून फोटोला लाईक झालं आणि आज थेट मैदानात म्हणजे नक्की चाललंय काय? असा प्रश्न ट्रोलर्स विचारत आहे.
अवनीत कौर क्रिकेट सामना पाहण्यासाठी येण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वीही अवनीतने क्रिकेट सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावली आहे. अवनीत कौर चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी दुबईच्या स्टेडियममध्ये हजर होती. पण यावेळी तिचं मैदानात उपस्थित असण्याचा चाहते वेगळा अर्थ काढत आहेत. मात्र विराट कोहलीने यापूर्वीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे ट्रोलर्स काहीच कारण नसताना ट्रोल करत आहेत.
Avneet Kaur in the stands. pic.twitter.com/BjKY3sf4fX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 6, 2025
विराट कोहलीने चुकून अवनीतच्या फोटोला लाईक केल्यानंतर लिहिलं की, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की फीड क्लिअर करताना अल्गोरिथमने चुकून एक इंटररॅक्शन रजिस्टर केला आहे. यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया कोणतेही अनावश्यक प्रश्न निर्माण करू नका. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.’
दुसरीकडे, #ViratLikedAvneet हा टॅग ट्रेंड होऊ लागला. इतकंच काय तर अवनीत कौरचे इन्स्टाग्रामवर एकाच दिवसात 1.8 दशलक्ष फॉलोअर्स वाढले. इतकंच काय तर प्रायोजित पोस्टचा दर एका रात्रीत 2 लाख रुपयांवरून 2.6 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.
