IPL, Cricket : क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी, मुंबईच्या क्रिकेटरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

IPL, Cricket : क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी, मुंबईच्या क्रिकेटरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
क्रिकेटरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Image Credit source: aaj tak

मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज राजेश वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

शुभम कुलकर्णी

|

Apr 24, 2022 | 10:59 PM

मुंबई : आयपीएलचा (IPL) पंधरावा सीजन सुरु असून आज मुंबई (MI) आणि लखनौचा (LSG) सामना खेळवला जातोय. यातच एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज राजेश वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजेश वर्मा 2006 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचे सदस्य होते. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. राजेश वर्मा 2006 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा सदस्य होते. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज आणि 2006-07 रणजी करंडक विजेते संघाचे सदस्य असलेले राजेश वर्मा यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वर्मा केवळ 40 वर्षांचे होते. त्याचा मुंबईचा माजी सहकारी भाविन ठक्करने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. राजेश वर्मा यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा निर्माण झाली आहे.

विशेष कामगिरी

आपल्या कारकिर्दीत केवळ सात प्रथम श्रेणी सामने खेळू शकलेला राजेश वर्मा 2006-07 मध्ये मुंबईच्या रणजी चॅम्पियन संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. 2002-03 मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2008 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला. त्याने सात सामन्यांत 23 बळी घेतले. याशिवाय त्याने 11 ‘लिस्ट ए’ सामन्यांत 20 विकेट घेतल्या.

इतर बातम्या

Special Report | Rana दाम्पत्यांवर ठाकरे सरकारकडून राजद्रोहाचा गुन्हा दाखल

Manisha Kayande : मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला, पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचं नाव नसल्यावरून मनिषा कायंदेंचा निशाणा

Video : मुंबई इंडियन्सला 169 धावांचं टार्गेट, पाहा केएल राहुलचा जोरदार षटकार, आयपीएलचे खास Highlights Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें