Video : मुंबई इंडियन्सला 169 धावांचं टार्गेट, पाहा केएल राहुलचा जोरदार षटकार, आयपीएलचे खास Highlights Video

लखनौने 20 ओवरमध्ये 6 बाद 168 धावा काढल्या. आता मुंबई इंडियन्सला 169 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे.

Video : मुंबई इंडियन्सला 169 धावांचं टार्गेट, पाहा केएल राहुलचा जोरदार षटकार, आयपीएलचे खास Highlights Video
केएल राहुलImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 10:28 PM

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामातील मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) सामन्याची पहिली इनिंग झाली आहे. यामध्ये लखनौला क्विंटन डी कॉकच्या रूपाने पहिला धक्का बसला. तो नऊ चेंडूत 10 धावा काढून बाद झाला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने त्याला रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. त्यानंतर किरॉन पोलार्डने लखनौची दुसऱ्या विकेटची मोठी भागीदारी तोडण्यात यश मिळवलं. त्याच्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मनीषला मेरेडिथकरवी झेलबाद केले. मनीषने बाद होण्यापूर्वी 22 चेंडूत 22 धावा केल्या. तर दुसरीकडे मार्कस स्टॉइनिस पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो डॅनियल सॅमने टिळक वर्माच्या हाती झेलबाद झाला. लखनौने तीन चेंडूंत त्यांचे दोन मोठे विकेट गमावले. कृणाल पांड्याही काही विशेष करू शकला नाही आणि एक धाव काढून पोलार्डच्या चेंडूवर शौकीनकडे झेलबाद झाला. अशा प्रकारे लखनौने 20 ओवरमध्ये 6 बाद 168 धावा काढल्या. आता मुंबई इंडियन्सला 169 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे.

केएल राहुलचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केएल राहुलचं शतक, अर्धशतक

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने 61 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने षटकारासह मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याने दोन्ही शतके मुंबईविरुद्धच झळकावली. एका हंगामात एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा तो कोहलीनंतरचा दुसरा खेळाडू आहे. तर त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत आणखी एक अर्धशतक आपल्या नावावर केले आहे. यावेळी त्याने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

केएल राहुलचं शतक, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

प्लेऑफमध्ये इंडियन्स जाणार?

लीगमधील 14 सामन्यांपैकी पहिले 7 सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत. अशा स्थितीत मुंबईने आगामी सात सामने जिंकले तरी केवळ 14 गुण जमा करू शकतील. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाचे 16 गुण असणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईचा संघ उर्वरित संघांच्या बाजूने असेल आणि संघाने धावगती सुधारली तर एक टक्का मुंबई पात्र ठरेल, असं बोललं जातंय.

कॅच पकडता पकडता षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पॉईंट्स टेबलचं गणित

लखनौने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एकूण सात सामने खेळवले आहे. त्यापैकी लखनौच्या संघाला चार सामन्यात यश आलंय. तर तीन सामन्यात लखनौच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये आठ गुण मिळाले आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा विचार केल्यास या संघाला अजूनही विजयाचं खातं आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये उघडता आलेलं नाही. त्यांनी आतापर्यंत सात सामने खेळले आहे. त्या सातही सामन्यात त्यांना अपयश आलंय. मात्र, आज 169 धावांचं टार्गेट पूर्ण केल्यास यश निश्चित आहे.

इतर बातम्या

Special Report | शिवसैनिकांच्या निशाण्यावर Kirit Somaiya

Kirit Somaiya : राज्यातला वाद पुन्हा दिल्लीत पोहोचणार, सोमय्यांसह भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटणार

Nagpur Police Suicide : नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, शिपाई पदावर होते कार्यरत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.