Nagpur Police Suicide : नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, शिपाई पदावर होते कार्यरत

किरण सलामे हे सदर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी अचानक त्यांनी धरमपेठ पोलिस क्वार्टरमधील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

Nagpur Police Suicide : नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, शिपाई पदावर होते कार्यरत
पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 9:44 PM

नागपूर : नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या क्वार्टरमध्ये आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. किरण सलामे असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते सदर पोलिस ठाण्यात शिपाई (Constable) पदावर कार्यरत होते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र नैराश्येतून असे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धरमपेठ पोलिस क्वार्टरमध्ये सलामे राहत होते. अंबाझरी पोलिस याप्रकरणी सखोल तपास करीत आहेत. (A police Constable committed suicide by hanging himself for unknown reasons in Nagpur)

किरण सलामे हे सदर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी अचानक त्यांनी धरमपेठ पोलिस क्वार्टरमधील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. कामाच्या तणावातून की अन्य कारणाने सलामे यांनी आत्महत्या याचा पोलिस शोध घेत आहेत.

खोलीत गळफास घेऊन केली आत्महत्या

मूळचा कोंढाळी येथील रहिवासी असलेला किरण सलामे 2014 मध्ये शहर पोलीस दलात रुजू झाले होते. एक वर्षापासून ते सदर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते धरमपेठ परिसरातील पोलिस वसाहतीत आई आणि छोट्या भावासह राहत होते. त्यांचा भाऊ खाजगी कंपनीत नोकरी करतो. शनिवारी किरणची सुट्टी होती. त्यामुळे ते सायंकाळनंतर घराबाहेर पडले आणि रात्री 10.30 च्या सुमारास घरी परतले. बाजूच्या रिकाम्या खोलीमध्ये झोपायला गेले. रविवारी सकाळी त्यांच्या आईने त्यांना आवाज दिला. मात्र दार आतून बंद होते. वारंवार आवाज देऊनही ते प्रतिसाद देत नसल्याने आईने शेजाऱ्यांना सांगितले. शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरच्या भागातून डोकावले असता किरण गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. ही माहिती कळताच पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (A police Constable committed suicide by hanging himself for unknown reasons in Nagpur)

इतर बातम्या

Ambernath Firing : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, थोडक्यात बचावला

Bihar Murder : बिहारमध्ये डबल मर्डर, पती-पत्नीच्या संशयास्पद हत्येने खळबळ

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.