AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्याती तीन सामन्यांची टी20 मालिका सप्टेंबर महिन्यात होत आहे. या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे असलं तरी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सामने होणार आहे. असं असताना या मालिकेमुळे बांगलादेशला फटका बसला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की...
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका, पण बांगलादेशाला बसला मोठा फटका; कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: Aug 12, 2026 | 10:25 AM
Share

India vs Afghanistan Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत तीन सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेचं वेळापत्रकही जाहीर झालं असून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात ही स्पर्धा पार पडेल. या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे हे विशेष… या मालिकेमुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला फायदा होणार आहे. तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा पुन्हा एकदा हिरमोड होईल. कारण भारतीय बांग्लादेश दौऱ्यावर जाणार नाही, हे या वेळापत्रकावरून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता शक्यता संपली असून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 11 ऑगस्टला टी20 मालिकेची घोषणा केली. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या. कारण भारतीय संघाने बांग्लादेश दौरा करावा यासाठी बीसीबी पूर्ण जोर देत होती. इतकंच काय तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतासाठी 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यानचा कालावधीही निश्चित केला होता. या दरम्यान, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळण्याची योजना होती. पण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून टी20 वेळापत्रक जाहीर होताच बांगलादेशचा तिळपापड झाला आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाचं बांग्लादेश दौऱ्यावर जाणं शक्यच नाही.

सलग तिसऱ्या वर्षी मालिका टाळली?

बांग्लादेश क्रिकेट बोर्ड मागच्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या संभाव्य दौऱ्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून वारंवार विनवण्या केल्या जात आहे. बांग्लादेश बोर्डाचे अध्यक्ष माजी स्टार फलंदाज तमीम इकबाल यांनी देशाच्या सरकारसोबतही वार्तालाप केला. भारत सरकार आणि बीसीसीआयला या दौऱ्यासाठी विनवणी करण्याची विनंती त्यांनी सरकारपुढे ठेवली. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याबाबत काहीच म्हंटलेलं नाही. तसेच प्रस्तावही बांग्लादेश क्रिकेट बोर्डासमोर ठेवलेला नाही. त्यामुळे सलग तिसर्‍या वर्षी बांगलादेशचा प्रयत्न अयशस्वी ठरली आहे. यापूर्वी 2024 आणि 2025 मध्ये क्रिकेट दौऱ्याबाबत धुराळा उडाला होता.

भारत बांग्लादेश क्रिकेटला वादाची किनार!

बांगलादेशमध्ये 2024 नंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. राजकीय उलथापालथीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. इतकंच काय तर बांगलादेशमधील अंतर्गत राजकीय अस्थिरता आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना तेथे पाठवणे जोखमीचे मानले जात आहे. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप 2026 दरम्यान बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुकारून भारतात येण्यास नकार दिला होता. त्यामुळे बांग्लादेश दौरा वारंवार पुढे ढकलला जात किंवा टाळला जात आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल