Video : शाकिब अल हसनला पुन्हा एकदा राग अनावर, आता फॅन्ससोबत केलं असं काही

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन या ना त्या कारणाने कायमच चर्चेत असतो. त्याचा राग तर अनेकांनी मैदानात पाहिला आहे. आता असंच काहीसा प्रकार त्याने एका फॅन्ससोबत केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Video : शाकिब अल हसनला पुन्हा एकदा राग अनावर, आता फॅन्ससोबत केलं असं काही
Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 1:50 PM

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. बांगलादेशमध्ये त्याचा एक वेगळा फॅनबेस आहे. त्याची मैदानातील कामगिरी पाहता क्रिकेट लीगमध्ये त्याला पसंती मिळाली आहे. पण असं सर्व असताना शाकिब अल हसन आणि त्याचा राग हे एक वेगळंच समीकरण आहे. रागाच्या भरात त्याने अनेकदा टोकाचं पाऊल उचललं आह. यासाठी त्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. असं असताना सोशल मीडियावरील एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हायरल व्हिडीओत शाकिब अल हसनने सर्वच मर्यादा ओलांडल्याचं दिसत आहे. क्रिकेटपटू कितीही महान असला तरी त्याचं वागणं खूपच महत्त्वाचं ठरतं. नाहीतर क्रीडाप्रेमींच्या रडारवर येण्यास वेळ लागत नाही. आता तर शाकीब अल हसनने ग्राउंड्समॅनसोबत गैरवर्तन केल्याचं दिसत आहे. शाकिब अल हसनसोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे आला होता. मात्र शाकिबला या गोष्टीचा राग आला आणि त्याने ग्राउंड्समॅनची मान पकडली आणि ढकलत नेलं. इतकंच काय हात उगारण्याचा प्रयत्न करतो. यानंतर ग्राउंड्समॅन हताश होत बेंचवर जाऊन आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहत बसतो. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बरंच काही सांगून जातात.

शाकिब अल हसनचं ग्राउंड्समॅनसोबत असं वागणं क्रीडाप्रेमींना रुचलेलं नाही. ग्राउंड्समॅन खेळाडूंना खेळण्यासाठी खेळपट्टी तयार करतात. मैदान क्रिकेट खेळण्यासाठी सर्व बाजूने व्यवस्थित करतात. असं असताना शाकिब अल हसनने एक सेल्फी घेतला असता तर काय झालं असतं. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, सेल्फी घेताना तिथे तसं कोणीच नव्हतं. क्रिकेट फॅन्सची गर्दी असती तर गोष्टी वेगळी असती. हीच बाब नेटकऱ्यांना रुचलेली नाही. दुसरीकडे, शाकिब अल हसनचं काही वैयक्तिक कारणही असू शकतं. पण एक सेल्फिने काय झालं असतं असा प्रश्नही उपस्थित होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधी शूट केला याबाबत माहिती नाही. यावर अजून तरी काही स्पष्टीकरण आलेलं नाही.

शाकिब अल हसनने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये 67 कसोटी, 247 वनडे आणि 117 टी20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाकिबच्या नावावर 700 विकेट्स आहेत. सध्या बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिका सुरु आहे. मात्र या संघात शाकिब अल हसनला स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे, बांगलादेशने आपल्या टी20 वर्ल्डकप संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे या संघात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.