AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 मधून स्टार बॉलर दुखापतीमुळे आऊट, टीमला मोठा धक्का

Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेत एकूण 6 टीम खेळणार आहेत. स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच स्टार बॉलर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

Asia Cup 2023 मधून स्टार बॉलर दुखापतीमुळे आऊट, टीमला मोठा धक्का
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा उद्याच्या सामन्यासाठी संघात काही बदल करू शकतो. हा सामना हरला जिंकला तरी भारताचे फायनल खेळणं निश्चित आहे.
| Updated on: Aug 22, 2023 | 3:49 PM
Share

मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या आशिया कपसाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळनंतर बीसीसीआयने 21 ऑगस्ट रोजी टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडियात 17 जणांची निवड करण्यात आली. रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर हार्दिक पंड्या हाच उपकर्णधार असणार आहे. आशिया कपला आता मोजून 7 दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्याआधी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा वेगवान गोलंदाज हा दुखापतीमुळे आशिया कपमध्ये बाहेर पडला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

एबादोत हुसेन ‘आऊट’

आशिया कपमधून वेगवान गोलंदाज एबादोत हुसेन बाहेर पडला आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट टीमची अडचण वाढली आहे. एबादोतच्या जागी 20 वर्षीय युवा अनकॅप्ड खेळाडूला संधी देण्यात आली आहे. एबादोतची दुखापत ही तांझिम हसन साकिब याच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे आता तांझिमला आशिया कपमधून एकदिवसीय पदार्पण करण्याची संधी मिळते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

बांगलादेशचा आशिया कपमधील पहिला सामना केव्हा?

दरम्यान बांगलादेश स्पर्धेतील आपला पहिला सामना हा श्रीलंका विरुद्ध कँडी इथे खेळणार आहे. हा सामना गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर बांगलादेश 3 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध लाहोर इथे साखळी फेरीतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळेल.

कोणती टीम कोणत्या ग्रुपमध्ये

यंदा आशिया कपसाठी नेपाळ क्रिकेट टीमनेही क्वालिफाय केलं आहे. त्यामुळे सहभागी संघांची संख्या ही 5 वरुन 6 झाली आहे. त्यामुळे 6 टीम 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आल्या आहेत. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ग्रुप बी मध्ये आहेत.

बांगलादेशला मोठा झटका

आशिया कपसाठी बांगलादेश क्रिकेट टीम

शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन ध्रुबो, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक महेदी हसन, शेख महेदी हसन, शमीम हुसेन, तनजीद हसन तमीम आणि तनझिम हसन साकीब.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.