AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL 2025-26: प्रीति झिंटाच्या खेळाडूने गमावलेला सामना पालटला, 6 विकेटनंतर 25 चेंडूत घडलं असं काही

बिग बॅश लीग स्पर्धेत रंगतदार सामन्यांची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळत आहे. या स्पर्धेत मेलबर्न स्टार्सला जिंकलेला सामना गमवण्याची वेळ आली. ब्रिस्बेन हीटच्या दोन फलंदाजांनी शेवटच्या चार षटकात सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. काय झालं ते जाणून घ्या..

BBL 2025-26: प्रीति झिंटाच्या खेळाडूने गमावलेला सामना पालटला, 6 विकेटनंतर 25 चेंडूत घडलं असं काही
प्रीति झिंटाच्या खेळाडूने गमावलेला सामना पालटला, 6 विकेटनंतर 25 चेंडूत घडलं असं काही Image Credit source: Bradley Kanaris/Getty Images
| Updated on: Jan 02, 2026 | 6:38 PM
Share

Brisbane Heat vs Melbourne Stars: बिग बॅश लीग स्पर्धेतील 20व्या सामन्यात ब्रिस्बेन हिट आणि मेलबर्न स्टार्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ब्रिस्बेन हिटने मेलबर्न स्टार्सला 4 विकेटने पराभूत केलं. गाबामध्ये खेळल्या गेल्या या सामन्यात मेलबर्नच्या संघाने 20 षटकात 195 धावा केल्या. हे लक्ष्य ब्रिस्बेन हिने 2 चेंडू राखून पूर्ण केलं. खरं तर हा सामना मेलबर्न स्टार्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण आठव्या क्रमांकावर उतरलेल्या झेव्हियरल बार्टलेटने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचं चित्र पालटून टाकलं. मॅक्स ब्रायंटसोबत 25 चेंडूत सामना मेलबर्न स्टार्सच्या घशातून खेचून आणला. ब्रिस्बेन हिटने 196 धावांचा पाठलाग करताना 16 व्या षटकात 133 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. ब्रिस्बेन हिटला 63 धावांची गरज होती आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला झेव्हियर बार्टलेट उतरला. या जोडीने 25 चेंडूत 66 केल्या.

बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिटच्या ब्रायंटने 17व्या षटकापासून आक्रमक फटकेबाजीला सुरुवात केली. स्वेप्सनच्या षटकात षटकार आणि चौकार मारला. त्यानंतर सामन्याचं रूपडं पालटू लागलं. या षटकात एकूण 16 धावा आल्या. 18व्या षटकात पीटर सिडल आणि त्याच्या षटकात 17 धावा आल्या. ब्रायंटने शेवटच्या तीन चेंडूवर 15 धावा काढल्या. 19व्या षटकात 17 धावा काढल्या. ब्रायंट आणि बार्टलेटने या षटकात चौकार आणि षटकार मारले. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती. ब्रायंटने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूर षटकार आणि चौकार मारला आणि विजय मिळूवन दिला. मॅक्स ब्रायंटने 26 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. तर झेव्हियर बार्टलेटने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. पंजाब किंग्सने बार्टलेटला 80 लाखात रिटेन केलं आहे.

मॅक्स ब्रायंट म्हणाला की, मला वाटतं शेवटच्या 4-5 षटकांत आमच्याकडे विकेट होत्या. तिथे राहण्यासाठी ही खूप छान जागा आहे. झेव्हियरने 16-17 व्या षटकात माझ्यावरील थोडासा दबाव कमी केला. त्याला श्रेय जाते. मला वाटते, बाहेर जाऊन प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करण्याची संधी दिली आणि आज रात्री यशस्वी झालो. आम्ही सामन्यापूर्वी म्हटले होते की, हे करो किंवा मरो असे आहे. आम्हाला गाब्बावर हरायचे नाही. आम्ही येथे 3 पैकी 3 आहोत आणि आशा आहे की, आम्ही अंतिम फेरीत प्रवेश करू. ते परिपूर्ण असेल. मला वाटते की आम्हाला दोन घरच्या मैदानावर जिंकण्याची गरज आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...