IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन बदलला, बीसीसीआयचा मोठा निर्णय

India Odi Sqaud For Odi Series Against New Zealand 2026 : न्यूझीलंडने काही आठवड्यांआधीच भारत दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला होता. त्यानंतर आता 3 जानेवारीला बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे.

IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन बदलला, बीसीसीआयचा मोठा निर्णय
Team India Huddle Talk
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 03, 2026 | 5:38 PM

टीम इंडिया 2026 वर्षातील पहिली आणि एकदिवसीय मालिका न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand Odi Series 2026) खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय निवड समितीने मालिकेच्या 8 दिवसांआधी अखेर भारतीय संघाची घोषणा केली आहे. क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून एकदिवसीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? याची प्रतिक्षा होती. बीसीसीआयने (Bcci) ही प्रतिक्षा अखेर संपवली आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी कर्णधार बदलला आहे.

शुबमन-श्रेयसचं कमबॅक

एकदिवसीय संघात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या कर्णधार आणि उपकर्णधार जोडीचं कमबॅक झालं आहे. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाली होती. तर श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅच घेताना दुखापत झालेली. तेव्हापासून श्रेयस टीममधून बाहेर होता. मात्र आता न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतून शुबमन-श्रेयसचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मात्र श्रेयस या मालिकेत खेळणार की नाही? हे त्याच्या फिटसनेवर अवलंबून असेल, असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

कर्णधार बदलणार

केएल राहुल याने भारताच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेतृत्व केलं होतं. मात्र आता शुबमन परतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शुबमन नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

मियाँ मॅजिकचं कमबॅक

शुबमन-श्रेयस व्यतिरिक्त एकदिवसीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी या दोघांचंही पुनरागमन झालं आहे.

मोहम्मद शमीला संधी नाही

दरम्यान टीम इंडियाचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला पुन्हा एकदा निवड समितीने डच्चू दिला आहे. शमीला या मालिकेत संधी मिळेल, असं म्हटलं जात होतं. मात्र निवड समितीने शमीला पुन्हा एकदा संधी दिलेली नाही. त्यामुळे आता शमीला पुन्हा संधी मिळेल, याची आशा धुसर झालीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी, बडोदा

दुसरा सामना, 14 जानेवारी, राजकोट

तिसरा आणि अंतिम सामना, 18 जानेवारी, इंदूर

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसीद कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जैस्वाल.