IPL 2022 चं शेड्यूल BCCI कडून जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळले जाणार सामने

BCCI ने शुक्रवारी अधिकृतरित्या IPL च्या 15 व्या सीजनच्या तारखांची घोषणा केली आहे. आयपीएलची सुरुवात 26 मार्चला होणार आहे.

IPL 2022 चं शेड्यूल BCCI कडून जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळले जाणार सामने
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 3:58 PM

मुंबई: BCCI ने शुक्रवारी अधिकृतरित्या IPL च्या 15 व्या सीजनच्या तारखांची घोषणा केली आहे. आयपीएलची सुरुवात 26 मार्चला होणार आहे. लीगमधील फायनलचा सामना 29 मे रोजी होईल. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई (Mumbai) आणि पुण्यात खेळले जाणार आहेत. आयपीएलमध्ये यावेळी बराच बदल दिसेल. यावेळी आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ आहेत. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे लीगमधील बहुतांश सामने भारतात झाले नाहीत. यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.

प्लेऑफचे सामने कुठे?

प्लेऑफ संबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही. फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार आहेत. 14 मधले सात सामने घरच्या मैदानावर तर सात दुसऱ्या मैदानावर होतील. लीगमध्ये यंदा 60 ऐवजी 74 सामने होतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळेल. चार संघ फक्त एक-एक सामना खेळतील. लीग राऊंडनंतर चार प्लेऑफचे सामने होतील. पण त्यांचं स्थळ आणि तारीख जाहीर झालेली नाही.

10 टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी 

2011 प्रमाणे आताही संघांची ग्रुपमध्ये विभागणी केली जाईल. 10 टीम्सना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात येईल. दोन ग्रुप्समध्ये प्रत्येकी पाच संघ असतील. आपल्या ग्रुपमधल्या संघाबरोबर एकदा आणि दुसऱ्या ग्रुप बरोबर दोनदा खेळण्याची संधी मिळेल. काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑक्शनमध्ये दहा फ्रेंचायजींनी एकूण 204 खेळाडू विकत घेतले होते. याआधी 33 खेळाडूंना रिटेन करण्यात आलं होतं. म्हणजे एकूण 237 खेळाडू स्पर्धेमध्ये खेळणार आहेत.

प्रेक्षकांबद्दल महाराष्ट्र सरकार घेईल निर्णय

“प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल. त्यांच्या परवानगीनुसार निर्णय होईल. सुरुवातीला 40 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल. कोविडची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली, तर स्पर्धेच्या अखेरीस प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिली जाईल” असे बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले.

bcci announced ipl 2022 schedule teams start date players list match list

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.