AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Captain : सूर्यकुमार यादव कॅप्टन झाल्यावर त्याच्या पत्नीची पोस्ट तुफान व्हायरल, म्हणाली…

सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. सूर्या आता श्रीलंका दौऱ्यावर टी-20 संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. अशातच सूर्याची पत्नी देविशा शेट्टीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे.

Captain : सूर्यकुमार यादव कॅप्टन झाल्यावर त्याच्या पत्नीची पोस्ट तुफान व्हायरल, म्हणाली...
| Updated on: Jul 21, 2024 | 4:40 PM
Share

टीम इंडियाच्या T-20 संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादव याची निवड केली गेली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी सूर्याकडे टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आल्याने सर्वांना धक्का बसला. कारण हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद जाणार असं सर्वांना वाटत होतं. यंदा टीम इंडियाने जिंकलेल्या वर्ल्ड कप संघाचा हार्दिक उपकर्णधार होता. त्यामुळे रोहित निवृत्त झाल्यावर आता हार्दिकच कॅप्टन होणार असं वाटत होतं. मात्र टीम इंडियाचे नवीन कोच गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंटने ही जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवली. 33 वर्षीय सूर्याला मोठी जबाबदारी त्याला मिळाली आहे. अशातच आपला पती टीम इंडियाचा कर्णधार झाल्यावर सूर्याची पत्नी देविशा शेट्टी हिने एक पोस्ट केलीये.

जेव्हा भारतसाठी तू खेळायल सुरुवात केलीस तेव्हा असा दिवस कधी येईल आम्हाला वाटलं नाही. देव महान आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ हे योग्य वेळी आली की देतो. तुझा मला खूप अभिमान आहे पण आता कुठे ही सुरूवात असून खूप लांबचा पल्ला गाठायचा असल्याचं देविशा शेट्टीने म्हटलं आहे. सूर्यकुमारच्या पत्नीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे.

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्समध्ये खेळत आहे. मात्र आता आगामी आयपीएल सीझनमध्ये त्याला केकेआर संघाच्या कर्णधारपदाची ऑफर असल्याची जोरदार चर्चा आहे. गौतम गंभीर ज्यावेळी केकेआरचा कॅप्टन होता त्यावेळी सूर्यकुमार यादव हा उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत होता. त्यामुळे केकेआर परत एकदा स्कायला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.

टी 20 सीरिज : पहिला सामना, 27 जुलै दुसरा सामना, 28 जुलै तिसरा सामना, 30 जुलै एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक : पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुसरा सामना, 4 ऑगस्ट, तिसरा सामना, 7 ऑगस्ट

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ : (India T20I and Squad against Sri Lanka Tour)

सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), जैस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.