Team India : टी 20 वर्ल्ड कप टीममधून रिंकू सिंह याला डच्चू, कुणाला संधी?

Team India Squad World Cup 2024 : बीसीसीआय निवड समितीने आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

Team India : टी 20 वर्ल्ड कप टीममधून रिंकू सिंह याला डच्चू, कुणाला संधी?
rinku singh team india,
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 4:17 PM

आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅपटन्सी करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तसेच युझवेंद्र चहल याची अनेक महिन्यानंतर टीम इंडियाची रिएन्ट्री झाली आहे. एका बाजूला अनेक खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही खेळाडूंना संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल आणि फिनीशर रिंकू सिंह या दोघांची निवड करण्यात आलेली नाही. रिंकू सिंह हा टी 20 वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार होता. त्याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्यामुळे रिंकूला वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र निवड समितीने रिंकला डावललं आहे. रिंकू सिंहचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

निवड समितीने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर 4 खेळाडूंना राखीव म्हणून संधी दिली आहे. बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंमध्ये 2 फलंदाज आणि 2 गोलंदाजांना संधी दिली आहे. यामध्ये शुबमन गिल आणि रिंकू सिंह हे फलंदाज आहेत. तर खलील अहमद आणि आवेश खान हे दोघे गोलंदाज आहेत.

तर चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलच्या 17 व्या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबे याने बाजी मारलीय. शिवम दुबेने मुख्य संघाचं तिकीट मिळवलंय. शिवमने अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत अफलातून कामगरी केली होती. तसेच त्याने आयपीएलमध्येही बॅटिंग आणि बॉलिंगनेही आपली छाप सोडली. त्याला संधी मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर शिवम स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलाय.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

Non Stop LIVE Update
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....