IND vs SL : श्रीलंका विरुद्धच्या टी 20-वनडे सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

बीसीसीआयने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे.

IND vs SL : श्रीलंका विरुद्धच्या टी 20-वनडे सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर
IND vs SL team india Image Credit source: फाईल फोटो
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 11:52 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात नववर्षापासून टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआयने (Bcci) ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने या मालिकांसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही अपेक्षेप्रमाणे हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) देण्यात आली आहे. तर वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. टी 20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलला विश्रांती दिली आहे की वगळलं आहे, असं काहीच नमूद करण्यात आलेलं नाही. (bcci announced team india squad against to sri lanka t 20 and odi series sri lanka tour of india hardik pandya rohit sharma suryakumar yadav)

मुंबईकर सूर्यकुमार यादव उपकर्णधार

बीसीसीआयने मुंबईकर सूर्यकुमार यादवचं प्रमोशन केलं आहे. बीसीसीआयने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमारला उपकर्णधार केलं आहे. त्यामुळे आता सूर्यकुमार नव्या जबाबदारीसह मैदानात खेळताना दिसणार आहे.

पंत टीममधून ‘आऊट’

सातत्याने आऊट ऑफ फॉर्म असणाऱ्या ऋषभ पंतला टी 20 वनडे अशा दोन्ही सीरिजमधून वगळण्यात आलंय. पंतला गेल्या अनेक मालिकांमध्ये सातत्याने संधी देण्यात आली. मात्र त्याला स्वत:ला सिद्ध करता आले नाही. परिणामी त्याला अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

वनडे सीरीजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

Non Stop LIVE Update
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.