BCCI : शुबमन गिल कर्णधार होताच बीसीसीआयने तो निर्णय बदलला
India Cricket Team Bcci : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाच्या 2 सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी आता मोजून 11 दिवस बाकी आहेत. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टेस्ट सीरिजला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. उभयसंघातील पहिला सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने आगामी 2 सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने 2 सामन्यांचे ठिकाण बदलले आहेत. बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौरा करणार आहे. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकी 3-3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतणार आहे. टीम इंडिया मायदेशात वेस्टइंडिज विरुद्ध 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयने आता या ठिकाणात बदल केला आहे.
बीसीसीआयने विंडीज विरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं आहे. त्यानुसार दुसरा सामना हा आता इडन गार्डन्सऐवजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. बीसीसीआयने या व्यतिरिक्त विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही.
भारत-विंडीज कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरा सामना, 10 ते 14 ऑक्टोबर, कोलकाताऐवजी नवी दिल्ली
तसेच 14 ते 26 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील सलामीचा सामना हा नवी दिल्लीत खेळवण्यात येणार होता. मात्र आता हा सामना ईडन गार्डन्समध्ये शिफ्ट करण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून 2 सामन्यांचं ठिकाण बदललं
🚨 NEWS 🚨
BCCI announces updated venues for Team India (International home season) & South Africa A Tour of India.
Details 🔽 #TeamIndia | @IDFCFIRSTBank https://t.co/vaXuFZQDRA
— BCCI (@BCCI) June 9, 2025
भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिज शेड्यूल
पहिला सामना, 14 ते 18 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स
दुसरा सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी
दरम्यान बीसीसीआयने 2 सामन्यांचं ठिकाण नक्की का बदललं आहे? हे समजू शकलेलं नाही. मात्र सामन्यांचं ठिकाण बदलले असल्याने चाहते नाराज झाले आहेत.
