AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार का? बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

आयपीएल 2025 स्पर्धेबाबत आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझींनी सपोर्ट स्टाफमध्ये भरणा सुरु केली आहे. दिग्गज खेळाडूंसह नवी रणनिती आखली जात आहे. असं असताना यंदाच्या आयपीएलमध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार की नाही? असा प्रश्न समोर आला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार का? बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
IPL 2025 Auction
| Updated on: Sep 27, 2024 | 5:58 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धा सर्वार्थाने चर्चेत आली आहे. रिटेंशन आणि मेगा लिलावामुळे या स्पर्धेला आधीच रंगत चढली आहे. असं असताना आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार की नाही? याबाबत खलबतं सुरु आहेत. आयपीएलने प्रत्येक पर्वासाठी सामन्यांची संख्या सूचीबद्ध केली होती. त्यानुसार टप्प्याटप्याने सामन्यांची संख्या 94 पर्यंत घेऊन जाण्याचा विचार आहे. यासाठी 2025 आणि 2026 या पर्वात सामन्यांची संख्या 74 वरून 84 करण्याचं ठरलं होतं. पण आता ही संख्या 74 राहील असं सांगण्यात येत आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या पर्वात 74 सामने खेळले जातील. म्हणजेच 2022 या वर्षी ठरवलल्या सामन्यांपेक्षा 10 सामने कमी होतील. टेंडर दस्ताऐवजानुसार, आयपीएलमध्ये 2023-2024 स्पर्धेसाठी 74 सामने, 2025-2026 साठी 84 सामने आणि 2027 साठी 94 सामन्यांचा विचार केला गेला होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये असं काय घडलं की, फक्त 74 सामने खेळवले जातील. त्याबाबतचा उल्लेखही रिपोर्टमध्ये केला गेला आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आयपीएलने 2025 या वर्षात 74 सामनेच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण असं आहे की, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांचा कामाचा ताण हाताळण्यास मदत होईल. तसेच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तसेच अंतिम फेरीसाठी फेव्हरेट मानला जात आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय खेळाडूंना महत्त्वाच्या सामन्यांच्या तयारीसाठी पुरेशी विश्रांती देण्यासाठी हा विचार करत आहे. बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी मागच्या महिन्यात आयपीएल सामन्यांबाबत केलेलं वक्तव्यही महत्त्वाचं ठरणार आहे.

बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितलं होतं की, ‘आम्ही आयपीएल 2025 मध्ये 84 सामने आयोजित करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, कारण सामन्यांची संख्या वाढल्यामुळे खेळाडूंवर वाढणारा ताण आम्हाला लक्षात ठेवावा लागेल.’ त्यामुळे 84 सामने हा कराराचा भाग असला तरी यंदा 74 सामने खेळवायचे की 84 हे ठरवण्याचा सर्वस्वी निर्णय हा बीसीसीआयकडे आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं होतं.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.