AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा टीममधून बाहेर जाणार, पण लगेच नाही, असा आहे प्लान

BCCI Plan for Transition in Team India : वेस्ट इंडिज टूरवर टीम इंडियात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. हा टूर झाल्यानंतर एका प्लानिग अंतर्गत टीम इंडियात बदल होतील.

Team India | रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा  टीममधून बाहेर जाणार, पण लगेच नाही, असा आहे प्लान
Virat Kohli-Rohit sharmaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 18, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई : टीम इंडियात बदल होणार. पण हे बदल लगेच होणार नाहीत. विचारपूर्वक एका रणनिती अंतर्गत टीम इंडियात बदल होतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर बदलाची मागणी जोर धरु लागली आहे. टीम इंडियात कुठलाही बदल झटपट, घाई गडबडीत होणार नाही. विचारपूर्वक टीम इंडियात बदल होतील. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या फॅब फोरची टीममधून गच्छंती अटळ आहे.

भारतीय सिलेक्टर्स 6 ते 7 वर्षापूर्वी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाहीत. नीट विचारपूर्वक, सावधपणे पावलं उचलली जातील. 6 ते 7 वर्षापूर्वीच्या चुकीचा संदर्भ 2012-14 च्या फेजमध्ये झालेल्या चुकीशी आहे.

यावेळी असं होणार नाही

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्यावेळी तत्कालिन फॅब फोर रिटायर झाल्यानंतर पुन्हा फलंदाजांची फळी उभी करण्या्साठी वेळ लागला होता. कारण BCCI कडे आधीपासून कुठला प्लान नव्हता. पण यावेळी सर्व प्लानिगनुसारच होईल.

बदलाची प्रक्रिया कशी सुरु होणार?

वेस्ट इंडिज टूर दरम्यान टीम इंडियात कोणताही मोठा बदल होणार नाही, असं इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिलय. म्हणजेच फॅब फोर खेळताना दिसतील. पण या सीरीजनंतर टीम इंडियात हळू-हळू बदलाची प्रक्रिया सुरु होईल. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर सीरीजपर्यंत पुन्हा मजबुतीने टीमची बांधणी करण्याचं BCCI च लक्ष्य आहे. यात युवा आणि अनुभवी खेळाडूंच मिश्रण असेल.

फॅब फोरमधून पहिला बाहेर कोण जाणार?

बदल कसा होणार? हा प्रश्न आहे. रिपोर्ट्नुसार वेस्ट इंडिज दौऱ्यातनंतर टीम इंडियात पहिला बदल दिसेल. फॅब फोरमधल्या पहिल्या सदस्याला टीममधून डच्चू मिळेल. फॅब फोरमधला टीम बाहेर जाणारा पहिला सदस्य कोण असेल? हा निर्णय फॉर्म पाहून घेतला जाईल.

टेस्ट टीमची घडी बिघडवणार नाही

WTC Final मधील खराब प्रदर्शनानंतर वेस्ट इंडिज टूरवर मुंबईचा यशस्वी जैस्वाल आणि महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळेल असं बोलल जात होतं. पण आता असं वाटतय, दोघांना अजून वाट पाहावी लागेल. कारण BCCI घाईगडबडीत टेस्ट टीमची घडी बिघडवायची नाहीय.

बदल टेस्टआधी वनडेमध्ये दिसणार?

रोहित शर्माचा फिटनेसचा विषय आहे. पण सध्या BCCI कडे काही पर्याय नाहीय. वनडे वर्ल्ड कपपर्यंत तो कॅप्टनशिपवर कायम राहील. भारताकडे टेस्टपेक्षा वनडेमध्ये जास्त पर्याय आहेत. टीममध्ये बदलाची प्रक्रिया टेस्टआधी वनडेमध्ये सुरु होईल.

BCCI चा अजूनही त्याच्यावर विश्वास

चेतेश्वर पुजाराला 2021-22 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम बाहेर करण्यात आलं होतं. पण 6 महिन्यानंतर त्याने टीममध्ये पुनरागमन केलं. पुनरागमनानंतर 8 टेस्ट मॅचमध्ये खेळताना त्याने फक्त 1 सेंच्युरी झळकवली. या खराब प्रदर्शनानंतरही बीसीसीआयचा त्याच्यावर विश्वास आहे. कारण पुजाराने त्याच्या चांगल्या दिवसात टीमसाठी बरच काही केलय. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयात त्याची भूमिका नाकारता येऊ शकत नाही. पुजाराच्या नंबर 3 च्या जागेवर कोण?

यशस्वी जैस्वाल देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुन पुजाराच्या अडचणी वाढवतोय. टीम इंडिया जैस्वालला टेस्टमध्ये नंबर 3 च्या पोजिशनवर पाहतेय. सध्या पुजारा या क्रमांकावर खेळतोय. ओपनिंगला शुभमन गिल आहे. निकट भविष्यात ऋतुराज गायकवाड ओपनिंगला रोहितची जागा घेऊ शकतो.

Follow Us
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.