भारत-ऑस्ट्रेलिया सीरीजपासून नवीन टायटल स्पॉन्सर, प्रत्येक सामन्यासाठी BCCI ला मिळणार इतके कोटी

भारतीय क्रिकेट बोर्डासोबतनाव जोडण्यासाठी मोठ मोठ्या कंपन्या आणि मोठ मोठे ब्रँडस सतत प्रयत्न करत असतात. फक्त काही कंपन्यांना यात यश मिळतं.

भारत-ऑस्ट्रेलिया सीरीजपासून नवीन टायटल स्पॉन्सर, प्रत्येक सामन्यासाठी BCCI ला मिळणार इतके कोटी
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 3:51 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट बोर्डासोबतनाव जोडण्यासाठी मोठ मोठ्या कंपन्या आणि मोठ मोठे ब्रँडस सतत प्रयत्न करत असतात. फक्त काही कंपन्यांना यात यश मिळतं. मोठी रक्कम खर्च करुन, या कंपन्या BCCI शी स्पॉन्सरशिप डील करतात. मागच्या काही वर्षात ही स्पर्धा तीव्र झाली आहे. यातून बीसीसीआयला भरपूर उत्पन्न मिळतं. प्रायोजकत्व (Sponsership) मिळवण्यासाठी जशी स्पर्धा असते, तसंच मागच्या काही वर्षात काही कंपन्यांनी डील सुद्धा तोडली आहे. यात पेटीएमच एक नवीन नाव जोडलं गेलं आहे.

Paytm डील संपवणार

BCCI ची टायटल स्पॉन्सर कंपनी पेटीएमने बोर्डासोबतच करार मध्येच संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कंपनीने बोर्डासमोर आपली इच्छा व्यक्त केली. बीसीसीआयने त्यांची विनंती मान्य केली आहे. एका रिपोर्टनुसार, 2023 पर्यंत चालणारा हा करार पुढच्या काही दिवसात संपवला जाऊ शकतो. पेटीएम स्पॉन्सरशिपचा अधिकार जगातील प्रमुख फायनान्स कंपनी मास्टरकार्डला ट्रान्सफर करण्याच्या तयारीत आहे.

कधीपासून बदल दिसणार?

भारतात होणाऱ्या मालिकेत टायटल स्पॉन्सर म्हणून पेटीएमच्या जागी मास्टरकार्डचं नाव दिसणार आहे, अंस वृत्त इनसाइट स्पोर्टने दिलं आहे. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यावेळी टी 20 सीरीजपासून टायटल स्पॉन्सरशिप मधला बदल दिसेल. आंतरराष्ट्रीय मालिकाच नाही, मास्टरकार्ड देशांतर्गत स्पर्धा खासकरुन रणजी ट्रॉफीच्यावेळी सुद्धा टायटन्स स्पॉन्सर असेल.

प्रत्येक सामन्यासाठी बोर्डाला किती रक्कम मिळणार?

टायटल स्पॉन्सरशिप ट्रान्सफर होणार असली, तरी किंमतीमध्ये काही बदल होणार नाही. मास्टरकार्ड प्रत्येक सामन्यासाठी 3.8 कोटी रुपये खर्च करेल. पेटीएमने याच किंमतीला 2019 साली डील साइन केली होती. बोर्डाला काही प्रमाणात अतिरिक्त रक्कम मिळू शकते. नियमांनुसार, स्पॉन्सरशिप ट्रान्सफरच्या विषयात पहिल्या कंपनीला ट्रान्सफर फीस म्हणून 5 टक्के रक्कम बोर्डाला द्यावी लागते.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.