विराट कोहलीच्या स्फोटक वक्तव्यांवर अखेर सौरव गांगुलीने सोडलं मौन

सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण विराट कोहलीला टी-20 चे कर्णधारपद सोडू नको, असं सांगितल्याचं म्हटलं होतं. आता कोहलीच्या दाव्यामुळे बीसीसीआय अध्यक्षांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

विराट कोहलीच्या स्फोटक वक्तव्यांवर अखेर सौरव गांगुलीने सोडलं मौन
Sourav Ganguly
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 6:23 PM

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या (Virat kohli) कालच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर आज अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मौन सोडले. विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक गौप्यस्फोट केले. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली अडचणीत आले आहेत. टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून कोणी आपल्याला अडवलं नाही तसंच वनडेच्या कॅप्टनशीपवरुन हटवण्यापूर्वी कोणी आपल्याशी संवाद साधला नाही, असं कोहलीने म्हटलं. त्यामुळे सौरव गांगुली खरं बोलतोय की, विराट कोहली असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण विराट कोहलीला टी-20 चे कर्णधारपद सोडू नको, असं सांगितल्याचं म्हटलं होतं. आता कोहलीच्या दाव्यामुळे बीसीसीआय अध्यक्षांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

“कसोटी मालिकेसाठी आठ डिसेंबरला संघ निवडीची बैठक होण्याच्या दीडतास आधी माझ्याशी संपर्क साधण्यात आला व वनडे कर्णधारपदावरुन हटवल्याची माहिती दिली. टी-20 चे कर्णधारपद सोडल्यापासून कोणी आपल्याशी संपर्क साधला नाही” असे कोहलीने सांगितले.

कोहलीच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर आता सौरव गांगुली यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी यावर आता जास्त काही बोलणार नाही. बोर्डा हा विषय हाताळेल. मी कमेंट करणार नाही, बोर्ड हा विषय योग्य पद्धतीने हाताळेल” असे गांगुली यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

दादाशी पंगा घेणारा विराट BCCI च्या फोटोंमधून गायब, हा इशारा का? IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं? BWF World Championships 2021: कोर्टवर राज्य करत सिंधूचा दिमाखात उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.