रोहित शर्माचं पुढे काय? बीसीसीआयने काय घेतला निर्णय? बैठकीत असं काही घडलं
बीसीसीआयच्या मुख्यालयात 3 सप्टेंबरला एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रोहित शर्माच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाणार अशी चर्चा होती. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात...

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. त्याचं पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्याचं आहे. पण त्याच्याबाबत बीसीसीआय आणि निवड समितीत मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत फिट बसत नाही, असं निवड समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह होतं. कारण इंग्लंड दौऱ्यातील वनडे मालिका त्याच्या कारकिर्दीची शेवटची मालिका असल्याचं बोललं गेलं. पण शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकलं आणि सर्वांची बोलती बंद केली. पण त्यानंतरही त्याच्या भवितव्याच्या वावड्या उठल्या. त्यामुळे मुंबईत 3 सप्टेंबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीकडे लक्ष लागून होतं. रोहित शर्माचं काय होणार? याचा फैसला या बैठकीत होणार होता, अशी चर्चा होता. आता बीसीसीआयच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे.
रोहित शर्माबद्दल बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितली की, तो सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळत आहे. तुम्हाला आणखी काय हवे आहे? मागच्या सामन्यात त्याने 130-140 धावा केल्या. मग त्याच्याबद्दल असं का बोललं जात आहे? मला अंदाज बांधणाऱ्यांच्या हाती आयते कोलीत द्यायचे नाही. देवजीत सैकिया यांच्या विधानानंतर रोहित शर्माचं वनडे संघातील स्थान कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध् त्याची संघात निवड होऊ शकते.
BCCI SECRATARY ON ROHIT SHARMA:
“He is playing superbly in all matches. What more do you want? In the last match, he scored 130-140 runs. So why is there speculation? I do not want to give fodder to the speculators”. [Subhayan Chakraborty] pic.twitter.com/lIwhch7AFq
— Johns. (@CricCrazyJohns) September 3, 2026
बीसीसीआयच्या बैठकीत रोहित शर्मा आणि अजित आगरकरच्या भविष्याचा निर्णय होणार होता. बीसीसीआयच्या बैठकीत बोर्ड पदाधिकाऱ्यांसह हेड कोच गौतम गंभीर, वनडे कसोटी कर्णधार शुबमन गिल, टी20 संघाचा श्रेयस अय्यर, सेंटर ऑफ एस्किलेंसचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि निवड समिती सदस्य होते. पण निवड समिती अध्यक्ष काही वैयक्तिक कारणामुळे हजर नव्हते.
