IPL 2025 : बॅटच्या आकाराबाबत आयसीसीचा नियम काय? सामन्यादरम्यान तपासणी कशासाठी?
Icc Rule For Cricket Bat Size Explainer : आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान आतापर्यंत पंचांनी अनेक सामन्यांदरम्यान बॅट तपासली आहे. याआधी ड्रेसिंग रुममध्ये पंचांद्वारे बॅटची तपासणी करण्यात असे. मात्र या मोसमापासूनच ऑन फिल्ड बॅट कशासाठी तपासण्यात येत आहे? जाणून घ्या

क्रिकेट हा गोलंदाजांचा कमी आणि फलंदाजांचा खेळ झालाय, असं सर्रासपणे म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे. फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांसाठी अनेक नियम आहेत. गोलंदाजांना त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतंच. मात्र दुसर्या बाजूला फलंदाजांसाठी काही नियम नाहीत का? असा प्रश्न त्यांना असलेल्या सवलती पाहता उपस्थित होतो. फलंदाजांकडून अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं जातं, मात्र त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे सामना बरोबरीचा व्हावा यासाठी आता बीसीसीआय एक्शन मोडमध्ये आली आहे. त्याचाच प्रत्यय क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमात सामन्यादरम्यान येत आहे. अंपायर्स फलंदाजांची बॅट घेऊन ती एका रिंगद्वारे तपासत आहेत. या निमित्ताने आपण बॅटच्या आकाराबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊयात. ...
