AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023: खिशात इतके हजार कोटी हवे, तरच विकत घेता येईल महिला IPL टीम, BCCI ची घोषणा

IPL 2023: या वर्षी मार्चपासून महिला आयपीएल सुरु करण्याची BCCI ची योजना आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये इतक्या टीम असतील.

IPL 2023: खिशात इतके हजार कोटी हवे, तरच विकत घेता येईल महिला IPL टीम, BCCI ची घोषणा
indian womens team
| Updated on: Jan 09, 2023 | 8:01 AM
Share

मुंबई: T20 क्रिकेटच्या फॅन्सना पुढच्या काही दिवसात आणखी रोमांचक सामने पहायला मिळू शकतात. कारण पुरुषांप्रमाणे आता महिला IPL आकाराला येत आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बऱ्याच कालावधीनंतर महिला आयपीएल सुरु करण्यासाठी पावलं उचलली आहेत. मार्च 2023 मध्ये पहिला सीजन आयोजित करण्याची योजना आहे. त्यासाठी BCCI वेगाने काम करतेय. यासाठी बीसीसीआयने खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनपासून फ्रेंचायजी विक्रीची योजना बनवली आहे. IPL फ्रेंचायजी प्रत्येक जण विकत घेऊ शकत नाही. पण महिला आयपीएलची फ्रेंचायजी विकत घेण्यासाठी खिशात किती रक्कम हवी, ते जाणून घ्या.

BCCI ने जारी केलं टेंडर

BCCI ने अलीकडेच महिला आयपीएलच्या पाच फ्रेंचायजी खरेदीसाठी टेंडर जारी केलं होतं. बीसीसीआयने या अंतर्गत महिला आयपीएल टीम विकत घेण्यासाठी टेंडर मागवले आहेत. पुरुष आयपीएलची फ्रेंचायजी असणाऱ्यांसह अन्य कंपन्यासुद्धा फ्रेंचायजी विकत घेण्यासाठी दावा करु शकतात. पण महिला आयपीएल टीम विकत घेण्यासाठी काही अटी-शर्थींच पालन कराव लागेल.

टीम विकत घेण्यासाठी अकाऊंटमध्ये इतके हजार कोटी हवे?

ज्या कंपनीला किंना कुठल्या खासगी पार्टीला महिला IPL टीम विकत घ्यायची असेल, तर त्यांच्या बँकेत कमीत कमी 1000 कोटी रुपये हवेत. बीसीसीआयने ही अट ठेवलीय. क्रिकेट वेबसाइट क्रिकबजने हे वृत्त दिलय. पुरुष आयपीएलशी तुलना केल्यास, 2021 मध्ये दोन नव्या फ्रेंचायजी विकत घेण्यासाठी बीसीसीआयने बेस प्राइस 3 हजार कोटी रुपये ठेवली होती.

छोटे-छोटे भागीदार एकत्र येऊ शकतात ?

बीसीसीआयने एक अट ठेवलीय. कंसोर्टियम म्हणजे छोटे-छोटे भागीदार एकत्र येऊन बोली लावू शकत नाही. म्हणजे ज्याला कोणाला फ्रेंचायजी विकत घ्यायची असेल, त्याला एक पार्टी म्हणून फ्रेंचायजी खरेदी करावी लागेल. महिला आयपीएलचे टीम मालक कोण? ‘या’ तारखेला घोषणा

फ्रेंचायजी खरेदीसाठी बीसीसीआयने शेवटची तारीख 21 जानेवारी ठेवली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र घेण्यासाठी आवेदकाला 5 लाख रुपये जमा करावे लागतील. 23 जानेवारी अर्जाची छाननी होईल. कुठल्याही आवेदकाच्या कागदपत्रात कुठलीही कमतरता असेल, तर बोर्डाला तो अर्ज बाद ठरवण्याचा अधिकार आहे. 25 जानेवारीला बीसीसीआय महिला आयपीएलच्या 5 फ्रेंचायजी मालकांची घोषणा करेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.