AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : ट्रॉफी देतो की नाही? मोहसीन नक्वीला शेवटचा इशारा, बीसीसीआय आक्रमक, पत्रात काय म्हटलंय?

BCCI writes letter to ACC Mohsin Naqvi: आशिया कप 2025 ट्रॉफीवरुन बीसीसीआयने आक्रमक भूमकिा घेतली आहे. बीसीसीआयने थेट पत्राद्वारे एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वीला थेट इशाराच दिलाय.

Asia Cup 2025 : ट्रॉफी देतो की नाही? मोहसीन नक्वीला शेवटचा इशारा, बीसीसीआय आक्रमक, पत्रात काय म्हटलंय?
BCCI writes letter to ACC Mohsin NaqviImage Credit source: PTI
| Updated on: Oct 21, 2025 | 5:24 PM
Share

टीम इंडियाने 28 सप्टेंबरला पाकिस्तानचा सलग तिसऱ्यांदा धुव्वा उडवत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकली होती. मात्र एसीसी अध्यक्ष असलेल्या पाकिस्तानी मोहसीन नक्वी याने टीम इंडियाला आशिया कप ट्रॉफी दिली नाही. आता अंतिम सामना होऊन जवळपास महिना होत आलाय. त्यानंतरही एसीसीने ट्रॉफी न दिल्याने बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीसीसीआयने नक्वीला पत्र लिहत इशारा धमकीवजा इशारा दिला आहे. ट्रॉफी न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशाराच बीसीसीआयने नक्वीला दिला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या इशाऱ्यानंतर नक्वी ट्रॉफी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

बीसीसीआय एक्शन मोडमध्ये

मोहसिन नक्वीने आता आशिया कप 2025 ट्रॉफी देण्याबाबत सकारात्मक उत्तर दिलं नाही तर बीसीसीआय टप्प्या-टप्प्याने नियमांद्वारे कारवाई करेल, असं बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना म्हटलं.

तिलक वर्माची निर्णायक खेळी

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला होता. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 2 बॉलआधी पूर्ण केलं होतं. भारताने 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 150 धावा केल्या होत्या. तिलक वर्मा याने धावांचा पाठलाग करताना भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. तिलकने नाबाद 69 धावांची खेळी केली होती. टीम इंडियाची या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली होती. टीम इंडियाने पाकिस्तानला याआधी साखळी आणि सुपर 4 फेरीत पराभूत केलं होतं.

ट्रॉफी चोर नक्वी!

फायनलनंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात होते. भारतीय खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सीरिज आणि इतर पुरस्कार स्वीकारले. मात्र टीम इंडियाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी असलेल्या एसीसी अध्यक्षाच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र एसीसीला दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हस्ते टीम इंडियाला ही ट्रॉफी देता आली असती. मात्र नक्वीने तसं न करता स्वत: जवळ ट्रॉफी ठेवली. नक्वी ट्रॉफी मैदानातून घेऊन निघून गेले. तेव्हापासून ट्रॉफीवरुन वाद सुरु आहे.  तसेच नक्वीने ट्रॉफी न दिल्याने त्याला ‘ट्रॉफी चोर नक्वी’ असंही नेटकरी म्हणत आहेत.

दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला 14 सप्टेंबरला साखळी फेरीत 7 विकेट्सने लोळवलं होतं. तसेच 21 सप्टेंबरला सुपर 4 मध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.