AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : फॉर्मसाठी धडपडणारा KL Rahul आता ‘या’ मंदिरात पोहोचला दर्शनासाठी, VIDEO

IND vs AUS Test : त्याला उपकर्णधार पदावरुनही हटवण्यात आलं आहे. टीममधील त्याच्या निवडीवरही सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. सर्वबाजूंनी संकटात सापडलेला केएल राहुल पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी लीन झाला आहे.

IND vs AUS Test : फॉर्मसाठी धडपडणारा KL Rahul आता 'या' मंदिरात पोहोचला दर्शनासाठी, VIDEO
KL rahul
| Updated on: Feb 26, 2023 | 1:19 PM
Share

IND vs AUS Test : केएल राहुल खराब फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 कसोटी सामन्याच्या 3 इनिंगमध्ये त्याने 20,17 आणि 1 रन्स केला. त्याला उपकर्णधार पदावरुनही हटवण्यात आलं आहे. टीममधील त्याच्या निवडीवरही सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. सर्वबाजूंनी संकटात सापडलेला केएल राहुल पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी लीन झाला आहे. भारताचा ओपनर केएल राहुल सर्व मंदिरात माथा टेकवतोय. नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओपनिंग टेस्टच्या आधी तो साई मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

भस्म आरतीमध्ये सहभागी

आता तिसऱ्या टेस्ट मॅचआधी राहुलने पत्नी अथिया शेट्टीसोबत महाकालच दर्शन घेतलं. तो भस्म आरतीमध्ये सहभागी झाला होता. राहुलने पत्नीसोबत मिळून महाकालवर जलाभिषेक सुद्धा केला. दोघे लग्नानंतर पहिल्यांदा महाकालच्या दर्शनासाठी पोहोचले. राहुल आणि अथियाने महाकाल मंदिरात बराचवेळ घालवला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. मागच्या महिन्यात 23 जानेवारीला दोघे विवाहबंधनात अडकले होते.

सराव सुरु करणार

दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅच दरम्यान 10 दिवसांचा वेळ होता. भारताने दिल्लीत दुसरी टेस्ट मॅच 3 दिवसात जिंकली. त्यानंतर भारतीय टीमला काही दिवसांचा ब्रेक देण्यात आला. टीमला 25 फेब्रुवारीला इंदोरमध्ये रिपोर्ट करण्यात सांगण्यात आलं होतं. ब्रेक दरम्यान केएल राहुल पत्नीसोबत तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेला होता. टीम आता तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी सराव सुरु करणार आहे. ही तिसरी टेस्ट मॅच भारतासाठी महत्त्वाची असेल. राहुलसाठी त्याची बॅट चालणं आवश्यक

4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. आता इंदोर कसोटी जिंकून फक्त सीरीजच नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न असेल. केएल राहुलला आपल्या रोलची पूर्ण कल्पना आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टीममध्ये स्थान टिकवण्यासाठी त्याची बॅट चालणं महत्त्वाच आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.