AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: SIX तर रोखलाच, पण त्याने बाऊंड्री लाइनवर पकडली अविश्वसनीय, थक्क करुन सोडणारी कॅच

स्टेडियममधल्या ज्या प्रेक्षकांनी ही कॅच पाहिली, त्यांना सर्वप्रथम आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. इतकी ही जबरदस्त कॅच आहे. एकदा VIDEO बघा

VIDEO: SIX तर रोखलाच, पण त्याने बाऊंड्री लाइनवर पकडली अविश्वसनीय, थक्क करुन सोडणारी कॅच
BBLImage Credit source: Screengrab
| Updated on: Jan 09, 2023 | 12:58 PM
Share

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू बेन कटिंग आपली बॅटिंग आणि बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. याच बळावर बिग बॅश लीगमध्ये तो कमालीचा खेळ दाखवतोय. बीबीएलमध्ये तो सिडनी थंडरकडून खेळतोय. सिडनी थंडरची रविवारी सिडनी सिक्सर्स विरुद्ध मॅच होती. या सामन्यात कटिंगने आपल्या फिल्डिंगची कमाल दाखवली. बेन कटिंगने अशी कॅच पकडली की, सर्वचजण थक्क झाले.

कटिंगने जबरदस्त फिल्डिंग केली, पण….

कटिंगने जबरदस्त फिल्डिंग केली. पण तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. थंडरने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 8 विकेट गमावून 133 धावा केल्या. सिडनी सिक्सर्सच्या टीमने 16.2 ओव्हर्समध्ये तीन विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं.

बाउंड्रीवर बनला सुपरमॅन

कटिंगने या मॅचमध्ये अशी कॅच पकडली, की पाहणारे सगळेच हैराण झाले. स्टँडमध्ये बसलेले प्रेक्षकही आपल्या आसनावरुन उठून उभे राहिले. सिडनी सिक्सर्सच्या डावाची तिसरी ओव्हर सुरु होती. ब्रेंडन डोगेट गोलंदाजी करत होता. जेम्स विंसे फलंदाजी करत होता. गोलंदाजाने दुसरा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. चेंडू बॅटला लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला. कटिंग तिथे उभा होता. चेंडूला पाहून त्या दिशेने धाव घेतली. चेंडू उंचावर होता. कटिंगने तिरकी झेप घेत दोन्ही हातांनी शानदार कॅच पकडली. कटिंगची ही कॅच पाहून प्रत्येकजण हैराण झाला. असा झाला सामना

सिडनी थंडरच्या टीमने पहिली बॅटिंग केली. पण ते मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. सॅम व्हाइटमॅनने त्यांच्यासाठी सर्वाधिक 42 धावा केल्या. त्याने 34 चेंडूत 42 धावा केल्या. त्याने आपल्या इनिंगमध्ये चार चौकार आणि एक षटकार लगावला. एलेक्स रॉसने 34 धावा केल्या. कटिंगने 15 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. यात पाच चौकार लगावले. सिडनी सिक्सर्सच्या शॉन एबॉटने तीन विकेट घेतल्या.

सिडनी सिक्सर्सचा कॅप्टन मोइजेज हेनरिक्स आणि जॉर्डन सिल्कने अर्धशतकं फटकावली. त्या बळावर त्यांनी सामना जिंकला. हेनरिक्सने 38 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या. जॉर्डनने 42 चेंडूत नाबाद 59 धावा फटकावल्या.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.