AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS | चेतेश्वर पुजारा याला तिसऱ्या कसोटीत महारेकॉर्ड करण्याची संधी

चेतेश्वर पुजारा टीम इंडियाच्या बॅटिंगचा प्रमुख आणि महत्वाचा आधारस्तंभ आहे. पुजाराने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवून दिला आहे.

INDvsAUS | चेतेश्वर पुजारा याला तिसऱ्या कसोटीत महारेकॉर्ड करण्याची संधी
| Updated on: Feb 28, 2023 | 9:36 PM
Share

इंदूर | टीम इंडियाचा आतापर्यंत बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील प्रवास शानदार राहिला आहे. टीम इंडियाने नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत कांगारुंवर एकतर्फी विजय मिळवला आहे. टीम इंडिया 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. उभयसंघातील तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा तारणहार आणि राहुल द्रविड याचा क्रिकेटमधील वारसदार म्हणून ओळखला जाणार ‘द वॉल 2’ अर्थात चेतेश्वर पुजारा याला महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

पुजाराला रेकॉर्ड करण्याची संधी

पुजाराला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विक्रम करण्याची संधी आहे. पुजाराला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये 2 हजार धावा करण्यासाठी 69 धावंची गरज आहे. पुजाराने आतापर्यंत आपल्या 100 कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत 22 सामने हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळले आहेत.

पुजाराने या 22 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्तीच्या सरासरीने 1 हजार 931 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 204 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही 2 हजार धावा करणं जमलेलं नाही. विराटने कांगारुंविरुद्ध 1 हजार 758 धावा केल्या आहेत.

पुजाराला ऑस्ट्रेलिया विरुद्ध या मालिकेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत पुजाराकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 34 कसोटींमध्ये 56.24 च्या सरासरीने 3 हजार 262 धावा केल्या आहेत. यात 9 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कॅप्टन), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...