AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा पत्रकार परिषदेत संतापला, हिटमॅनचं सडेतोड उत्तर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आलेल्या खेळपट्टीच्या आरोपावरुन सडेतोड उत्तर दिलं.

Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा पत्रकार परिषदेत संतापला, हिटमॅनचं सडेतोड उत्तर
| Updated on: Feb 08, 2023 | 6:48 PM
Share

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर सीरिजमधील पहिली मॅच 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर करण्यात आलं आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीआधी रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. रोहितने या पत्रकार परिषदेत खेळपट्टीवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांची सडेतोडपणे उत्तरं दिली. रोहित नक्की काय बोलला हे आपण जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया मीडियाकडून टीम इंडियावर खेळपट्टी स्वत:च्या फायद्यानुसार तयार केल्याचे आरोप लगावण्यात आले आहेत. या आरोपांवर रोहितने प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित काय बोलला?

“आमचं लक्ष हे खेळावर आहे. ऑस्ट्रेलिया मीडिया काय बोलतेय याकडे अजिबात लक्ष नाही. जर तुम्ही चांगली तयारी केली, तर परिणामही चांगलेच मिळतात. फक्त पीचवरच लक्ष देऊ नका. क्रिकेटवर फोकस करा. नागपूरमध्ये चांगलं खेळून चालणार नाही. दर्जेदार कामगिरी करावी लागेल”, असं रोहितने स्पष्ट केलं. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलिया मीडियाने फोटो शेअर खेळपट्टी आपल्या फायद्यानुसार तयार केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक अशी मालिका आहे. या मालिकेच्या निकालावरच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या फायनलमध्ये पोहचणार की नाही, हे ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामना हा 7 ते 11 जून 2023 दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

रोहित शर्मा याची पत्रकार परिषद

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच