INDvsAUS : टीम इंडियात मॅचविनर ऑलराउंडरची एन्ट्री, नागपूर टेस्टआधी दाखवला धमाका

श्रीलंका आणि न्यूझीलंडनंतर आता टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी आणि एकदिवलीय मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

INDvsAUS : टीम इंडियात मॅचविनर ऑलराउंडरची एन्ट्री, नागपूर टेस्टआधी दाखवला धमाका
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 10:05 PM

नागपूर : टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दोन हात करणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारतात दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 4 मॅचची ही सीरिज असणार आहे. या सीरिजला 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरुवात होत आहे. टीम इंडिया नेट्समध्ये सराव करतेय. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा यानेही बऱ्याच वेळ सराव केला. गुडघ्याच्या ऑपरेशनंतर जाडेजाने जवळपास 5 महिन्यांनी मैदानात कमबॅक केलं. जाडेदा रणजी ट्रॉफीत तामिळनाडू विरुद्ध कमबॅक केलं होतं. या सामन्यात जाडेजाने एकूण 7 विकेट्स घेतल्या होत्या.

जाडेजाचा जोरदार सराव

जाडेजाने पहिल्या सत्रात बॉलिंग आणि बॅटिंगचा सराव केला. चेतेश्वर पुजारा, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव यांचा अपवाद वगळता अनेक खेळाडू हे मर्यादित षटकांचे सामने खेळून आले आहेत. अशात पहिल्या टेस्टआधी प्रत्येक खेळाडूला आवश्यक तितका सराव मिळावा, या प्रयत्नात टीम मॅनेजमेंट आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी 2 सत्रांमध्ये सराव केला. पहिल्या सत्रात सकाळी अडीच तास सराव केला. त्यानंतर दुसऱ्या सेशलमध्ये खेळाडूंनी नेट्समध्ये घाम गाळला. टीम इंडियाच्या एकूण 16 खेळाडूंव्यतिरिक्त 4 नेट गोलंदाजांनीही सराव केला. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, रवीश्रीनिवास साई किशोर आणि सौरभ कुमार यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.