‘पाय तोडा आणि तोपर्यंत त्याला जिवंत ठेवा..’, फिरकीपटू युझवेंद्र चहलचा पारा चढला
कोलकाता येथील घटनेची तीव्र पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. प्रशिक्षणार्था डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. न्याय मिळावा यासाठी संपूर्ण देशात निदर्शनं होतं आहेत. आता फिरकीपटू युझवेंद्र चहलनेही आपला राग व्यक्त केला आहे.

देशात महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. कोलकात्याचं प्रकरण शांत होत नाही तोच बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी जनआक्रोश पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात उतरून 10 तास रेल्वेसेवा ठप्प केली. तसेच आरोपींना तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी केली. आरोपींना दया माया दाखवू नका अशी मागणी होत आहे. कोलकात्यातली घटनेवर भारतीय सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटू गप्प का आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात होता. भारतीय क्रिकेटपटूही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहेत. त्यानंतर सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज खेळाडूंनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. तसेच आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. आता फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपला राग व्यक्त केला आहे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. युझवेंद्र चहलने आरोपीला मृत्यूदंड देऊन चालणार नाही. तर त्यांना मारून टॉर्चर करून मरण्यासाठी सोडलं पाहीजे, असा राग व्यक्त केला आहे.
युझवेंद्र चहलने 21 ऑगस्टला इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. ‘फाशीवर चढवा जिथपर्यंत मृत्यू येत नाही. नको.. त्याचे पाय 90 डिग्रीमध्ये तोडा. त्याचे कॉलरबोन्स ठेचून टाका. प्रायव्हेट पार्टवर मारा. बलात्काऱ्यांना असं छळ सहन करण्यासाठी जिवंत ठेवा. त्यानंतर फाशीची शिक्षा द्या.’, असं क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याने सांगितलं आहे. युझवेंद्र चहलच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. त्याच्या या मागणीचं अनेकांनी समर्थन केलं आहे.
माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यानेही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देशभरातून होत आहे. देशाच्या अनेक भागात गुन्हेगारांना जनतेच्या हवाली करण्याची मागणी होत आहे. कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

