Rohit Sharma : मुंबई हरली पण शतकानंतर रोहितची एक कृती सगळ्यांनाच आवडली, प्रसिद्ध क्रिकेटपटूकडून भरभरुन कौतुक

Rohit Sharma : IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने रविवारी घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर चौथ्या पराभवाचा सामना केला. चेन्नई सुपर किेंग्सने मुंबईला हरवलं. मुंबईकडून एकटा रोहित शर्मा लढला. त्याने शतक झळकावलं. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने रोहितची त्यावेळची मैदानावरची कृती हेरली. त्यासाठी त्याचं भरपूर कौतुक केलं.

Rohit Sharma : मुंबई हरली पण शतकानंतर रोहितची एक कृती सगळ्यांनाच आवडली, प्रसिद्ध क्रिकेटपटूकडून भरभरुन कौतुक
rohit sharma mi vs cskImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 9:17 AM

मुंबई इंडियन्सचा अव्वल क्रिकेटपटू रोहित शर्माला IPL मध्ये दुसरं शतक झळकवायला 12 वर्ष लागली. रोहितने रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शतक झळकावलं. त्याने नाबाद 105 धावा केल्या. पण त्याचा काही फायदा झाला नाही. टीमला त्याच्या शतकामुळे विजय मिळाला नाही. मुंबई इंडियन्सचा सीएसकेने 20 धावांनी पराभव केला. त्यामुळे शतक झळकवण्याचा आनंद रोहित शर्माच्या चेहऱ्यावर अजिबात दिसला नाही. उलट वनडे वर्ल्ड 2023 च्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर चेहऱ्यावर जे भाव दिसलेले, तसाच रोहितचा चेहरा होता. अर्थात दोन्ही पराभवाची तशी तुलना होऊ शकत नाही. रोहित शर्माने CSK च्या माथिशा पाथिराणाला चौकार मारुन आपलं शतक पूर्ण केलं. त्यावेळी रोहित चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसले नाहीत.

रोहितच्या शतकानंतर त्याच्या सन्मानार्थ वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षक उभे राहिले. डग आऊटमधून काहींनी टाळ्या वाजवल्या. पण रोहित शांतच होता. त्याने बॅट उंचावली नाही. ग्लोव्हजला पंच मारला नाही. स्ट्राइकवर जाण्याआधी मोहम्मद नबी बरोबर थोडं बोलला. एक स्पष्ट होतं की, व्यक्तीगत कामगिरीपेक्षा रोहितसाठी टीमचा विजय महत्त्वपूर्ण होता. ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू ब्रेट ली ने सुद्धा रोहित शर्माच या गुणाच कौतुक केलं.

‘तर काही सिक्स हे स्टेडियमबाहेर गेले असते’

“हे उत्तम शतक होतं. शतक झळकवल्यानंतरही त्याने बॅट उंचावली नाही, हे मला आवडलं. व्यक्तीगत कामगिरीपेक्षा विजय जास्त महत्त्वाचा आहे, हे त्यातून दिसलं. पहिल्या चेंडूपासून त्याने प्रामाणिक हेतूने खेळ केला” असं ब्रेट ली जिओ सिनेमावर म्हणाला. “त्याने संपूर्ण मैदानात फटकेबाजी केली. 63 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या. यात 11 फोर, 5 सिक्स होते. दुसऱ्या स्टेडियममध्ये हा सामना असता, तर काही सिक्स हे स्टेडियमबाहेर गेले असते. ही खूप सुंदर फलंदाजी होती. पण दुर्देवाने काहीवेळा सर्व गोष्टी तुम्ही एकट्याने नाही करु शकतं” असं ब्रेट ली म्हणाला.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.