T20 WC: झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत होतात कर्णधार ट्रेव्हिस हेडने भारताच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर नोंदवला गेला आहे. दुबळ्या झिम्बाब्वे संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ट्रेव्हिस हेडने मनातल्या भावना व्यक्त केल्या. तसेच 2023 चा उल्लेख करत भारताच्या जखमेवर मीठ चोळलं.

T20 WC: झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत होतात कर्णधार ट्रेव्हिस हेडने भारताच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाला...
झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत होतात कर्णधार ट्रेव्हिस हेडने भारताच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाला...
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 13, 2026 | 4:33 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 19व्या सामन्यात उलथापालथ पाहायला मिळाली. झिम्बाब्वेने अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केलं. तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियन संघ झिम्बाब्वेच्या तुलनेत सर्वच बाजूने तगडा होता. तरीही ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नाणेफेकीचा कौलही ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता. त्यामुळे सर्व काही मनासारखं झालं होतं. पण निकाल काही बाजूने लागला नाही. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडी गमवून 169 धावा केल्या. तसेच विजयासाठी 170 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना 19.3 षटकात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 146 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 23 धावांनी जिंकला. यासह या स्पर्धेतील पहिला उलटफेर नोंदवला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची पुढची वाट बिकट झाली आहे. पण काय होईल सांगता येत नाही. असं असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ट्रेव्हिस हेडने 2023 वनडे वर्ल्डकपचा उल्लेख आवर्जून केला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ट्रेव्हिस हेड या पराभवानंतर म्हणाला की, ‘आम्ही आधी या स्थितीत सापडलो आहोत. आमच्या ड्रेसिंग रूममध्ये काही खेळाडू आहेत जे 2023 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळले आहेत. त्यांनी त्यातून मार्ग काढला आणि आम्ही तेव्हा ते करून दाखवलं आहे. म्हणून आता आम्ही ड्रेसिंग रूममध्ये शक्य तितका आत्मविश्वास ठेवण्यासाठी आणि आणखी दोन सामने जिंकण्यासाठी त्या ब्लूप्रिंटकडे परत जाऊ.’ ऑस्ट्रेलियाला सुपर 8 फेरीत जागा मिळवण्यासाठी उर्वरित दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना 16 फेब्रुवारीला आहे. तर शेवटचा सामना ओमानशी होणार असून हा सामना 20 फेब्रुवारीला होईल.

2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत काय झालं होतं?

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट आणि 52 चेंडू राखून पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 199 धावांचं आव्हान 41.2 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं होतं. दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 134 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग 7 सामने जिंकले आणि उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेला 3 विकेट आणि 16 चेंडू राखून मात दिली. तर अंतिम फेरीत भारताला 6 विकेट आणि 42 चेंडू राखून पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे ट्रेव्हिस हेडने हा संदर्भ देत भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us