Champions Trophy 2025 स्पर्धेला आणखी एक स्टार गोलंदाज मुकणार, सात दिवसांपूर्वीच केलं होतं डेब्यू
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आठही संघांनी कंबर कसली आहे. पण या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंना दुखापतींनी ग्रासलं आहे. आता आणखी एक स्टार गोलंदाज स्पर्धेला मुकला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी केली आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार असून पाकिस्तान आणि दुबईत सामने होणार आहेत. भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. असं सर्व असताना एका पाठोपाठ एक दिग्गज खेळाडूंना दुखापतीने ग्रासल्याची मालिका सुरु आहे. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह या सारखे दिग्गज गोलंदाज या स्पर्धेला मुकले आहेत. आता आणखी एक वेगवान गोलंदाज या स्पर्धेला मुकला आहे. 27 वर्षीय बेन सियर्सन मागच्या आठवड्यातच वनडेत डेब्यू केलं होतं. पाकिस्तानविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवली होती.पण पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम फेरीत तो संघाचा भाग नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजी बेन सियर्स याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्याऐवजी दुसरा खेळाडू घेण्याशिवाय न्यूझीलंडला पर्याय नव्हता. आता न्यूझीलंडच्या संघात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बेन सियर्स ऐवजी जॅकब टफी असणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, ‘कराचीमध्ये बुधवारी पहिल्या सराव सत्रादरम्यान सियर्सला डाव्या बाजूला हॅमस्ट्रिंगची दुखापत जाणवली. स्कॅननंतर त्याला दुखापत असल्याचं दिसून आलं आहे. त्याला यातून सावरण्यासाठी कमीत कमी दोन आठवड्यांचा कालावधी लागून शकतो. यामुळे सियर्स दुबईमध्ये भारताविरूद्धच्या सामन्यात थेट दिसण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दोन सामने खेळू शकणार नाही.’ त्याची अशी स्थिती पाहता न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना 19 फेब्रुवारीला पाकिस्तानशी होणार आहे.
Squad News | Fast bowler Ben Sears has been ruled out of the upcoming ICC Champions Trophy 2025 with a hamstring injury and will be replaced by Jacob Duffy. https://t.co/97RRDrouIG #ChampionsTrophy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 14, 2025
न्यूझीलंड टीम: मिचेल सँटनर (कर्णधार), रचिन रवींद्र,, केन विलियम्सन, विल यंग, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, डेरिल मिचेल, विल ओरूक, नाथन स्मिथ, जॅकब डफी.
