वरुण चक्रवर्तीमुळे रोहित शर्माची कोंडी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी असू शकते प्लेइंग 11
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी अवघे काही तास उरले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया कोणत्या खेळाडूंसह उतरेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. न्यूझीलंडविरुद्धची प्लेइंग इलेव्हन की हार्षित राणाला संधी देईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या लढतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात द्वंद्व होणार आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेत एकदा हरलेले नाही. भारताने तिन्ही सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आणि दोन सामने पावसामुळे रद्द झाले. आता दोन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी लढत होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने संघात एक बदल केला होता. हार्षित राणा ऐवजी वरुण चक्रवर्तीला संधी दिली होती. पण त्याने या सामन्यात पाच विकेट घेतल्याने कर्णधार रोहित शर्माची गोची झाली आहे. त्यामुळे रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरेल याची उत्सुकता लागून आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा संघात कोणताच बदल करणार नाही असं बोललं जात आहे. म्हणजेच न्यूझीलंडविरुद्धचा संघच मैदानात उतरवणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा चार फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला होता. यामुळे टीम इंडियाला 249 धावा करूनही 44 धावांनी विजय मिळवता आला. न्यूझीलंडचे 10 पैकी 9 विकेट हे फिरकीपटूंनी घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध असंच कॉम्बिनेशन असेल. जर रोहित शर्माने संघात कोणातही बदल केला नाही तर हार्षित राणाला बेंचवर बसावं लागेल. दुसरीकडे, अर्शदीप सिंह आणि ऋषभ पंत यांना बेंचवरच बसवलं जाईल.
दुसरीकडे, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात एक बदल आधीच निश्चित झाला आहे. आणि कारण मॅथ्यू शॉर्ट दुखापतीमुळे बाहेर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात खेळताना शॉर्टला दुखापत झाली. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन संघात कूपर कॉनोलीला स्थान देण्यात आले आहे
उपांत्य फेरीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11 अशी असू शकते
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चकवर्ती और मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया : ट्रेविस हेड, कूपर कोनोली, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, एलेक्स कॅरी, ग्लेन मैक्सवेल, बेन ड्वारशुईस, नाथन एलिस, एडम जंपा, स्पेन्सर जॉन्सन
