AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Charu Sharma, IPL Auction 2022: विराटला विकत घेणारा आता संभाळणार लिलावाची जबाबदारी

IPL Auction 2022: ह्यू एडमीड्स चक्कर येऊन कोसळले, त्यामुळे त्यांच्याजागी चारु शर्मा जबाबदारी संभाळणार आहेत.

Charu Sharma, IPL Auction 2022: विराटला विकत घेणारा आता संभाळणार लिलावाची जबाबदारी
| Updated on: Feb 12, 2022 | 4:06 PM
Share

बंगळुरु: IPL च्या 15 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन (Mega Auction 2022) सुरु असताना अचानक ह्यू एडमीड्स (Hugh Edmeades) चक्कर येऊन कोसळले. त्यामुळे सभागृहात सर्वांचा एकच गोंधळ उडाला. श्रीलंकेचा ऑलराऊंडर हसारंगावर बोली लावताना एडमीड्स यांना चक्कर आली. त्यामुळे काही वेळासाठी ऑक्शन स्थगित करण्यात आलं. एडमीड्स यांची प्रकृती आता चांगली आहे. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे ते चक्कर येऊन कोसळले. एडमीड्स यांना आता आराम करण्यास सांगितल असून त्यांच्याजागी ऑक्शनर बदलण्यात आला आहे. चारु शर्मा आता ऑक्शनची जबाबदारी संभाळणार आहेत. चारु शर्मा (Charu sharma) हे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आहेत. त्याशिवाय त्यांनी क्विज स्पर्धांच सूत्रसंचालनही केलं आहे. 2008 मध्ये ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी संबंधित होते.

विराट संघात घेणारे चारु शर्मा

आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये विराट कोहलीला आरसीबीमध्ये घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 2008 आयपीएलमध्ये RCB ने खूपच खराब कामगिरी केली. त्यामुळे त्यांना CEO पदावरुन हटवण्यात आले. RCB ने सीईओ पदावरुन हटवल्यानंतर चारु शर्मा यांनी फ्रेंचायजीविरोधात वक्तव्य केलं होतं. चारु शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी खूप मेहनत केली होती. पण सुरुवातीचे सामने हरल्यामुळे आरसीबीवर दबाव वाढला होता. त्यावेळच्या आरसीबी संघातील वातावरणाची तुलना त्यांनी प्रेशर कुकर बरोबर केली होती.

चारु शर्मा खेळाच्या क्षेत्रातील मोठं नाव

चारु शर्मा प्रो कबड्डी लीगचे संस्थापक आहेत. 2014 मध्ये त्यांनी आठ संघांना घेऊन ही लीग सुरु केली होती. त्यानंतर स्टार इंडियाने त्यांच्या कंपनीचे 74 टक्के शेअर विकत घेतले. चारु शर्मा क्रिकेट, कबड्डी शिवाय गोल्फमध्येही कॉमेंट्री करतात. त्याशिवाय त्यांनी टीव्हीवर अनेक क्विज शोचे सूत्रसंचालन केलं आहे.

कसे आहेत एडमीड्स?

ह्यू एडमीड्स यांची प्रकृती आता चांगली आहे. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे ते चक्कर येऊन कोसळले, असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांच्या देखरेखील त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....