AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार विजेत्यांची यादी, पाहा आजी, युवा, माजी क्रिकेटर्सचा हा सन्मान

आजी, माजी क्रिकेटर्सच्या उपस्थितीत क्रिकेट रेटिंग पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. हा पुरस्कार आघाडीची टायर कंपनी CEAT लिमिटेडकडून देण्यात येतो

CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार विजेत्यांची यादी, पाहा आजी, युवा, माजी क्रिकेटर्सचा हा सन्मान
| Updated on: Aug 25, 2023 | 12:03 PM
Share

मुंबई : मुंबईत प्रमुख आजी, माजी क्रिकेटर्सच्या उपस्थितीत क्रिकेट रेटिंग पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. हा पुरस्कार आघाडीची टायर कंपनी CEAT लिमिटेडकडून देण्यात येतो. मुंबईत नुकताच हा कार्यक्रम पार पडला. खेळाची त्यातही क्रिकेट या विषयातून ममत्वाची भावना जोपासण्याचा हा उद्देश आहे. म्हणूनच क्रिकेट रेटिंग पुरस्कार म्हणजेच सीसीआर दिला जातो. हा पंचवीसावा पुरस्कार होता. या कार्यक्रमात काही माजी क्रिकेटर्सनी अतिशय विनोदी किस्से देखील सांगितले, यावेळी माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, युवा क्रिकेटर शुभमन गिल आणि सर्वांचं आकर्षण ठरलेला रोहित शर्मा उपस्थित होता.

शुभमन गिल याला क्रिकेटपीचवरील विशेष खेळासाठी ‘सीएटी मेन्स इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. तो यावेळी म्हणाला, “मला नामांकित CEAT पुरूष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला, याविषयी मला आनंद झाला आहे, क्रिकेटर म्हणून मी नेहमीच विचार करतो की, जास्तच जास्त धावसंख्या आणि विजय कसा मिळवता येईल, आपला आलेख कसा उंचावता येईल, निश्चितच या पुरस्काराने मला दिलेला आत्नसन्मान मला या सर्व बाबबीत यश मिळवण्यात अत्यंत मदतीचा ठरणार आहे”.

हा क्रिकेट पुरस्कार देताना आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, क्रिकेटला पाठिंबा आणि देश ही सीमा न पाळता जगभरातील क्रिकेटर्सचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. आम्ही या सर्व क्रिकेटर्सना नमन करतो, सलाम करतो. क्रिकेटला जीवन वाहून देणे, समर्पण करणे ही भावना आणि मेहनतच विलक्षण आहे. सीएट रेटिंगच्या माध्यमातून आम्हाला आकर्षित करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो. CEAT च्या या क्रिकेट रेटिंग पुरस्कारामध्ये फक्त पुरुष क्रिकेटर्सच नाहीत, तर महिला क्रिकेटर्सनाही गौरवण्यात येत आहे.

क्रिकेट हा सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणारा खेळ आहे. क्रिकेट अगदी कसोटी सामना ते टी-२० अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारात वाढत आहे, हा पुरस्कार सर्वांना एकत्र आणत राहिल, सर्वांना खेळाविषयी प्रोत्साहन देत राहिल अशी अपेक्षा आहे.येणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाला आम्ही शुभेच्छा देतो, असंही हर्ष गोयंका म्हणाले.

क्रिकेट फॅन्सना बॉलीवूड नेहमीच आकर्षित करतं, आणि बॉलीवूडचे स्टारही क्रिकेटर्सचे चाहते असतातच. म्हणून CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्सपासून प्रेरित झालेली, घूमर या बॉलीवूड सिनेमाची टीम मॅक्कुलमला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा पुरस्कार देण्यासाठी स्टेजवर CEAT टीममध्ये सामील झाली.

CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमधील विजेत्यांची यादी

CEAT जीवनगौरव विजेता: मदन लाल

CEAT जीवनगौरव विजेता: करसन घावरी

CEAT पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: शुभमन गिल

CEAT महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर: दीप्ती शर्मा

CEAT आंतरराष्ट्रीय बॅटर ऑफ द इयर: शुभमन गिल

CEAT ODI बॅटर ऑफ द इयर: शुभमन गिल

CEAT ODI बॉलर ऑफ द इयर: अॅडम झाम्पा

CEAT आंतरराष्ट्रीय बॉलर ऑफ द इयर: टिम साउथी

CEAT टेस्ट बॅट्समन ऑफ द इयर: केन विल्यमसन

CEAT टेस्ट बॉलर ऑफ द इयर: प्रभात जयसूर्या

CEAT T20 बॅट्समन ऑफ द इयर: सूर्यकुमार यादव

CEAT T20 बॉलर ऑफ द इयर: भुवनेश्वर कुमार

CEAT डोमेस्टिक क्रिकेटर ऑफ द इयर: जलज सक्सेना

300 टी-20 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज: युजवेंद्र चहल

U-19 महिला विश्वचषक विजेत्या कर्णधाराचा सत्कार: शफाली वर्मा

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक: ब्रेंडन मॅक्युल

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.