
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्सवर सुरु आहे. पहिल्या डावात भारताने 471 धावा केल्या असल्या तरी त्याला इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. असं असताना तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा पहिल्याच सत्रात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय संघ आणि पंचांमध्ये चेंडूबाबत वाद पाहायला मिळाला. भारतीय विकेटकीपर ऋषभ पंत आणि गोलंदाज ऋषभ पंत चेंडूबाबत नाराज दिसले. त्यांनी पंचांकडे चेंडू बदलण्याची मागणी केली. पण पंचांनी ही मागणी फेटाळून लावली. भारतीय संघाच्या मते चेंडूचा शेप खराब झाला होता. 61 व्या षटकात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत चेंडू घेऊन पंचाकडे गेला आणि तपासण्याची मागणी केली. पंचांनी चेंडू तपासला पण चेंडू आरामात साच्यातून गेला. त्यामुळे हा चेंडू नियमानुसार योग्य होता. पण पंतने या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली आणि चेंडू फेकून दिला. यामुळे मैदानात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
ऋषभ पंतनंतर हा वाद इथेच थांबला नाही तर दोन षटकानंतर मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवला. हे षटक टाकत असताना मोहम्मद सिराजने चेंडूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच हा चेंडू बदलण्याची मागणी केली. पंचांनी पुन्हा एकदा साच्यात टाकून चेंडू तपासला. तेव्हाही चेंडू योग्य असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पंचांनी चेंडू बदलण्यास नकार दिला. यामुळे भारतीय संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
Rishabh Pant asked the umpire to change the ball, got denied and then threw it in frustration 😭😭😭 pic.twitter.com/F1A78XGwWV
— Sandy (@flamboypant) June 22, 2025
या दरम्यान जसप्रीत बुमराहने देशी पंचांशी चर्चा केली. मात्र पंचांनी आपल्या निर्णयात कोणताही बदल केला नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही षटकांचा खेळ झाल्यावर पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. 74 व्या षटकानंतर चेंडू बदलण्यात आला. खरं नवा चेंडू हा 80 षटकं टाकल्यानंतर बदलला जातो. पण सहा षटकांआधीच चेंडूची स्थिती पाहून पंचांनी चेंडू बदलला. पण असं असलं तरी हॅरी ब्रूकची विकेट काही झटपट काढता आली नाही. त्याच्या खेळीमुळे इंग्लंड 400 च्या जवळ पोहोचली. धावांचं अंतर झपाट्याने कमी होत आहे.