AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : कर्णधार शुबमन गिल आयसीसीच्या रडारवर, शतक ठोकलं पण एक चूक पडणार महागात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरु आहे. या सामन्यात सध्यातरी भारतीय संघ वरचढ दिसत आहे. पण झटपट विकेट घेण्यात अपयश आलं तर पुढे चित्र बदलू शकतं. असं असताना कर्णधार शुबमन गिल आयसीसीच्या रडारवर आला आहे.

IND vs ENG : कर्णधार शुबमन गिल आयसीसीच्या रडारवर, शतक ठोकलं पण एक चूक पडणार महागात
IND vs ENG : कर्णधार शुबमन गिल आयसीसीच्या रडारवर, शतक ठोकलं पण एक चूक पडणार महागातImage Credit source: PTI
Updated on: Jun 22, 2025 | 4:45 PM
Share

भारत इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून तिसरा दिवस निर्णायक ठरणार आहे. सामना कोणच्या पारड्यात झुकला हे दिवसाच्या शेवटी कळून येईल. दरम्यान, भारताकडून यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंतने शतकी खेळी केल्याने भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. मात्र असं असताना शुबमन गिल आयसीसीच्या निशाण्यावर आला आहे. फलंदाजी करताना केलेली चूक त्याला महागात पडण्याची शक्यता आहे. सामनाधिकारी त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. शुबमन गिलने फलंदाजी करताना काळे मोजे घातले होते. आयसीसी ड्रेस कोड नियमाचं हे उल्लंघन होतं. कसोटी क्रिकेटमध्ये कोणताही फलंदाज काळे मोजे घालून फलंदाजी करू शकत नाही असा नियम आहे. नेमकं काय झालं ते समजून घेऊयात..

कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीने काही रंगांचे मोजे घालण्याची परवानगी दिली आहे. असं असताना शुबमन गिल मैदानात काळे मोजे घालून उतरला होता. आयसीसी नियम 19.45 नुसार, कसोटी सामन्यात फक्त पांढरे, क्रीम किंवा हलके तपकिरी रंगाचे मोजे घालण्याची परवानगी आहे. त्यामुळे शुबमन गिलवर कारवाई होऊ शकते. सामनाधिकारी रिची रिचर्डसन त्याच्या सामना फीच्या 10 ते 20 टक्के दंड आकारू शकतात. शुबमन गिलने चुकून किंवा त्याचे मोजे ओले असल्याने बदलले असतील कारवाई टाळली जाऊ शकते.

क्रिकेटमधील अशाच काही नियमांचा फटका यापूर्वी क्रिकेटपटूंना बसला आहे. 2016 मध्ये ख्रिस गेलने काळ्या रंगाची बॅट वापरली होती. तर 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने चुकीचं हेल्मेट घातल्याने सामना फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. 2019 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इमाम उल हक बॅटवर चुकीचा लोगो घालून मैदानात उतरला होता. तेव्हा त्यालाही शिक्षा झाली होती. जो रुटने 2021 मध्ये भारताविरूद्धच्या सामन्यात इंद्रधनुष्य असलेलं चिन्ह लावलं होते. एलजीबीटीक्यू+ समर्थनार्थ होतं. तेव्हा त्याला 15 टक्के दंड भरावा लागला होता. आता शुबमन गिलवर कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?.
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू.
असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्...
असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्....