हार्दिक पांड्याच्या जेवणावर कावळ्यांचा अटॅक, नताशाची अशी रिअ‍ॅक्शन…

हार्दिक पांड्याच्या जेवणावर कावळ्यांचा अटॅक, नताशाची अशी रिअ‍ॅक्शन...
Crows Attacked On Hardik Pandya Food

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. | Hardik Pandya

Akshay Adhav

|

Apr 02, 2021 | 9:06 AM

मुंबई :  इंग्लंडविरुद्धची (India Vs England) मालिका संपवून भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलच्या तयारीत गुंतले आहेत. आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) जवळपास सगळ्या संघांचे ट्रेनिंग कॅम्प (IPL Training Camp) सुरु झाले आहेत. अशातच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपल्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. तसंच या व्हिडीओवर त्याची पत्नी नताशानेही (Natasa Stankovic) मजेदार रिअॅक्शन दिल्याने फॅन्स देखील लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतायेत.(Crows Attacked On Hardik Pandya Food Natasa Stankovic reaction)

हार्दिक पांड्याच्या कावळ्यांचा अॅटॅक

सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणाऱ्या Pawri व्हिडीओसारखा हा व्हिडीओ असल्याचं सांगत हार्दिकने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही कावळ्यांनी हार्दिकच्या जेवणावर डल्ला मारला आहे. तर हार्दिकची पत्नी नताशा हातात कात्री घेऊन उभी असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक म्हणतोय, हा मी आहे, ही नताशा आहे आणि इथे पार्टी सुरु आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हार्दिकने व्हिडीओ पोस्ट केल्याबरोबर त्याच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर उड्या घेतल्या आहेत. केवळ सात ते आठ तासांच्या दरम्यान या व्हिडीओला कोटींच्या आसपास लोकांनी पाहिला आहे तर हजारो लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काही लोकांनी पार्टीचं निमित्त विचारत हार्दिकची मजा घेतली आहे.

लवकरच मुंबईकडून हार्दिकचा जलवा

हार्दिक पांड्याने 2015 साली मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. यावेळीही हार्दिक मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मागील सगळ्यात मोसमात त्याने आपल्या बॅटने मुंबईसाठी अनेक यादगार परफॉर्मन्स दिले आहेत. त्याच्या बळावर मुंबईने अनेक मॅचेस एकहाती जिंकल्या आहेत. समोरच्या संघातील बोलर्सला सळो की पळो करुन मुंबईला कोणत्याही परिस्थितीत जिंकून द्यायचं, हेच हार्दिक पांड्याचं लक्ष्य असतं.

(Crows Attacked On Hardik Pandya Food Natasa Stankovic reaction)

हे ही वाचा :

रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, उर्वशी रौतेलाचं खोचक उत्तर

आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, टी नटराजनला नवी कोरी गाडी भेट!

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलआधी मोठा दिलासा, शाहरुखने सोडला सुटकेचा निश्वास!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें