IPL 2024 : आयपीएलचं बिगुल वाजताच महेंद्रसिंह धोनी सज्ज, त्या चर्चा बाजूला ठेवत जोरदार तयारी Watch Video
आयपीएल 2024 स्पर्धेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. लवकरच या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात स्पर्धेला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. तर या स्पर्धेत पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. वयाचं कारण देत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आता महेंद्रसिंह धोनीने त्याला उत्तर दिलं आहे.

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मार्च ते मे 2024 मध्ये या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. महेंद्रसिह धोनी अजूनही आयपीएलमध्ये असून खेळणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पण या सर्व चर्चांना महेंद्रसिंह धोनीने आपल्या फलंदाजीने उत्तर दिलं आहे. या व्हिडीओत महेंद्रसिंह धोनी फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्यामुळे आयपीएल 2024 स्पर्धेत खेळताना दिसणार यावर एका अर्थाने शिक्कामोर्तब लागलं आहे. इतकंच काय तर चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्वही करणार आहे. धोनीच्या नव्या व्हिडीओ नेमकं काय आहे? हे जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. कारण महेंद्रसिंह धोनीचं वय, फिटनेसबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणार की नाही हा प्रश्न आपसूकच क्रीडाप्रेमींना पडत आहे. त्यात गेल्या पर्वात गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यावर स्पर्धेनंतर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कारण उत्तराखंडमध्ये आपल्या गावी गेल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता त्यात धोनी लंगडताना दिसला होता. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं.
महेंद्रसिंह धोनीच्या खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत महेंद्रसिंह धोनी फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तर त्यावर मात करण्याची क्षमता महेंद्रसिंह धोनीत असल्याचं दिसत आहे. या दरम्यान आपल्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेताना दिसला. पॅड आणि हेल्मेट घालून फलंदाजीसाठी उतरला होता.
MS Dhoni has started his preparations for IPL 2024. pic.twitter.com/zYKaV8mdnp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2024
महेंद्रसिंह धोनी आता थेट आयपीएल 2024 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. फिटनेस पाहता वर बॅटिंगला येणं कठीण आहे. मागच्या पर्वाप्रमाणे शेवटची काही षटकं खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. पण 20 षटकं विकेटकीपिंग करण्याची क्षमता मात्र त्याच्यात आहे. त्याच्या नेतृत्वगुणांचा फायदा चेन्नई सुपर किंग्सला होईल यात शंका नाही.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ : एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद सिंग, मिचेल सिंग, शेख रशीद. , निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.
