AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाच्या आयुष्यात परतला आनंद; चाहतेही झाले खुश!

भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधनाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिचं लग्न मोडल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अखेर स्मृतीच्या आयुष्यात आनंद परतला आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाच्या आयुष्यात परतला आनंद; चाहतेही झाले खुश!
Smriti MandhanaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 17, 2025 | 4:45 PM
Share

ICC Women ODI Ranking: भारताची स्टार ओपनिंग बॅट्समन आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाची दमदार कामगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृतीने अव्वल स्थान मिळवलं आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डला मागे टाकत जगातील ती जगातील पहिल्या क्रमांकाची फलंदाज ठरली आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर स्मृतीने हे स्थान पटकावलं आहे. या आठवड्यात स्मृतीचे रेटिंग पॉईंट्स 811 वर कायम आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यातील सुरू असलेल्या सीरिजमधील पहिल्या सामन्यात लॉराच्या जेमतेम कामगिरीमुळे ती दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लॉरा वोल्वार्डचं रेटिंग 814 वरून 806 वर पोहोचलं आहे. त्यामुळे स्मृती मानधनाला अव्वल स्थान पटकावता आलं आहे.

टॉप 10 मध्ये कोण आहेत?

ताज्या क्रमवारीत पहिल्या दोन स्थानांव्यतिरिक्त कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनर तिसऱ्या स्थानावर आणि इंग्लंडची नॅट सायव्हर-ब्रंट चौथ्या स्थानावर कायम आहे. भारताच्या दृष्टीने आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे जेमिमा रॉड्रिग्जनेही टॉप 10 मध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. दहाव्या क्रमांकावर असलेली जेमिमा या यादीतील दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

टॉप 10 वनडे बॅट्समन (डिसेंबर 2025)

  1. स्मृती मानधना (भारत)
  2. लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका)
  3. अ‍ॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  4. नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
  5. बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया)
  6. एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)
  7. सोफी डेव्हाईन (न्यूझीलंड) आणि एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) – संयुक्त
  8. हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज)
  9. जेमिमा रॉड्रिग्ज (भारत)

या क्रमवारीत बदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यातील पूर्व लंडनमध्ये खेळलेला पहिला एकदिवसीय सामना. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 7 विकेट्सने जिंकला. परंतु त्यांची कर्णधार लॉरा या सामन्यात फक्त 31 धावा करू शकली. तर दक्षिणा आफ्रिकेच्याच सुन लूसने आयर्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावून तिच्या टीमला विजय मिळवून दिला. यामुळे तिच्या रँकिंगमध्येही सुधारणा झाली. एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांनी झेप घेऊन ती 31 व्या स्थानावर पोहोचली आहे.

कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.