AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs KKR : चेन्नईची घरच्या मैदानात नाचक्की, सीएसकेचा IPL इतिहासातील सर्वात मोठा पराभव, केकेआरने इतिहास घडवला

CSK vs KKR IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. चेन्नईचा हा या हंगामातील एकूण सलग सहावा तर घरच्या मैदानातील तिसरा पराभव ठरला.

CSK vs KKR : चेन्नईची घरच्या मैदानात नाचक्की, सीएसकेचा IPL इतिहासातील सर्वात मोठा पराभव, केकेआरने इतिहास घडवला
csk vs kkr ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 11, 2025 | 11:23 PM
Share

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे आयपीएलच्या 18 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा अनुभवी महेंद्रसिंह धोनी याच्याकडे कर्णधारपदाची सूत्रं दिली.  ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईने सलग 4 सामने गमावले होते. त्यामुळे धोनी आपल्या नेतृत्वात सीएसकेच्या पराभवाची मालिका खंडीत करत चेन्नईला विजयी ट्रॅकवर आणेल, अशी आशा यलो आर्मीला होती. मात्र सर्व उलटच झालं. चेन्नईला घरच्या मैदानात एमए चिंदबरम स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. केकेआरने सीएसकेचं वस्त्रहरण केलं. चेन्नईचा हा या मोसमातील एकूण आणि सलग पाचवा पराभव ठरला. चेन्नईचा हा या हंगामातील एकूण सहावा सामना होता.

केकेआरकडून चेन्नईचं वस्त्रहरण

चेन्नईने केकेआरला विजयासाठी 104 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हे आव्हान 10.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि चेन्नईचं नाक कापलं. चेन्नईचा हा बॉलबाबत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. केकेआर टीमने 59 बॉल शेष ठेवत चेन्नईचा धुव्वा उडवला.

चेन्नईला याआधी 5 वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने 7 पेक्षा अधिक ओव्हर राखून पराभूत केलं होतं. मुंबईने 2020 साली शारजाहमध्ये चेन्नईचा 42 चेंडूंआधी धुव्वा उडवला होता. तर त्यानंतर पंजाब किंग्सने 2021 साली चेन्नईवर 42 चेंडूआधी मात केली होती. मात्र केकेआरने मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांचा रेकॉर्ड ब्रेक केला. केकेआर यासह चेन्नईविरुद्ध वेगवान विजय मिळवणारी टीम ठरली.

केकेआरची रेकॉर्डब्रेक कामगिरी

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.