AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: केकेआरला सीएसके विरुद्धच्या पराभवानंतर दणका, कॅप्टन अजिंक्यवर बीसीसीआयची कारवाई, कारण काय सांगितलं?

CSK vs KKR IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत 19 व्या मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याला या पराभवानंतर मोठा झटका लागला आहे.

IPL 2026: केकेआरला सीएसके विरुद्धच्या पराभवानंतर दणका, कॅप्टन अजिंक्यवर बीसीसीआयची कारवाई, कारण काय सांगितलं?
Ajinkya Rahane KKR CaptainImage Credit source: PTI
| Updated on: Apr 15, 2026 | 6:07 PM
Share

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांनतर कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेतील तिसरी यशस्वी टीम आहे. केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मात्र 3 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या केकेआरची 19 व्या मोसमात (IPL 2026) सध्या वाईट वेळ सुरु आहे. केकेआरवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ ओढावली आहे. केकेआरची पहिल्यांदाच 5 सामने खेळल्यानंतरही विजयी खातं न उघडण्याची पहिली वेळ ठरली आहे. केकेआरने आधी 4 पैकी 3 सामने गमावले. त्यामुळे केकेआर 14 एप्रिलला आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडेल, अशी आशा होती. मात्र केकेआरने चेन्नई सुपर किंग्स टीम विरुद्ध पराभवाची मालिका कायम ठेवली. त्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कॅप्टन अजिंक्य रहाणेवर बीसीसीआयची कारवाई

कर्णधार अजिंक्य रहाणे सीएसके विरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयच्या कारवाईचा शिकार झाला आहे. अजिंक्य स्लो ओव्हर रेट कायम राखू न शकल्याने त्याला बीसीसीआयच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून अजिंक्यवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्यला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अजिंक्य आतापर्यंत 19 व्या मोसमात ओव्हर रेट कायम न राखणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. या मोसमात सर्वातआधी अशी चूक पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्याकडून झाली होती. गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल यानेही तशीच चूक केली. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा देखील स्लो ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या अशी चूक करणारा चौथा कॅप्टन ठरला. आता अजिंक्य रहाणे याने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

केकेआरचा संघर्ष

केकेआरला 19 व्या मोसमात आतापर्यंत संघर्ष करावा लागला आहे. केकेआरच्या गोटात विस्फोटक फलंदाज आहेत. मात्र काहींना अजून चमक दाखवता आलेली नाही. तर काही फलंदाजांना मोठी खेळी करता येत नाहीय. तर गोलंदाजीतही अनुभवाचा अभाव दिसत आहेत.

केकेआरचा 32 धावांनी धुव्वा

दरम्यान सीएसकेने मंगळवारी 14 एप्रिलला केकेआरवर 32 धावांनी मात केली. सीएसकेने केकेआरसमोर 193 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र केकेआरला 7 विकेट्स गमावून 160 रन्सपर्यंतच पोहचता आलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...