IPL 2021: कॅप्टन कुलचा कारनामा, रोहित-विराटला पछाडत केला ‘हा’ पराक्रम

आयपीएलच्या गेल्या 14 वर्षांच्या इतिहासात एमएस धोनीने मोठं यश मिळवलं आहे, सोबतच त्याने अनेक विक्रमदेखील केले आहेत.

IPL 2021: कॅप्टन कुलचा कारनामा, रोहित-विराटला पछाडत केला 'हा' पराक्रम
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 11:50 PM

मुंबई : महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या सुरूवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघासोबत आहे. आयपीएलच्या गेल्या 14 वर्षांच्या इतिहासात धोनीने मोठं यश मिळवलं आहे, सोबतच त्याने अनेक विक्रमदेखील केले आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएल कारकीर्दीत 19 एप्रिल ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या तारखेला, 2008 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिला सामना खेळला होता. हा सामना पंजाब किंग्ज (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध खेळला गेला. सुरुवातीपासूनच धोनी चेन्नईच्या संघाचा कर्णधार आहे. आज 19 एप्रिल 2021 रोजी धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा खेळला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळवण्यात आला. आयपीएलमधील कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना आहे. धोनीने हा एक मोठा रेकॉर्ड आज आपल्या नावे केला आहे. धोनीने चेन्नईसह आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाचंदेखील नेतृत्व केलं आहे. (CSK vs RR, IPL 2021, MS Dhoni become 1st player to play 200 matches as captain for single IPL franchise)

आयपीएलमधील एकाच फ्रँचायझीसाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरा नंबर विराट कोहलीचा लागतो. विराटने 128 सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचं नेतृत्व केलं आहे. विराटनंतर या यादीत रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने 124 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे. धोनी 2008 पासून चेन्नई सुपरकिंग्स संघाचं नेतृत्त्व करतोय. तर कोहली 2012 मध्ये पहिल्यांदा बँगलोर संघाचा कर्णधार झाला. 2013 पासून तो आरसीबीचा नियमित कर्णधार म्हणून खेळतोय. तर रोहित शर्मा 2013 पासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून खेळतोय.

धोनीची आयपीएल कारकीर्द

आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत एकूण 207 सामने खेळले आहेत. यात त्याने 40.63 च्या सरासरीने 4632 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 23 आयपीएल अर्धशतके आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 313 चौकार आणि 216 षटकार लगावले आहेत. त्याचबरोबर धोनीने 113 झेल घेतले आहेत, तसेच 39 स्टंपिंगही (यष्टिचित) केले आहेत. आयपीएलमधील 207 सामन्यांपैकी 30 सामन्यात तो रायझिंग पुणे सुपरजाएंट संघाकडून खेळला आहे. आयपीएल 2017 आणि 2018 ही दोन वर्ष तो पुण्याच्या संघाकडून खेळत होता. या काळात चेन्नईचा संघ स्पॉट फिक्सिंगप्रकरणी स्पर्धेबाहेर होता.

200 व्या सामन्यात चेन्नईचा विजय

आयपीएल 2021 स्पर्धेत आज (सोमवार) महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना खेलवण्यात आला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करत चेन्नईने राजस्थानसमोर 188 धावांचा डोंगर उभा केला होता. चेन्नईने दिलेलं 189 धावांचं आव्हान राजस्थानच्या फलंदाजांना पेलवलं नाही. राजस्थानच्या फलंदाजांना 9 विकेट्सच्या बदल्यात केवळ 143 धावाच करता आल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने 49 धावांची खेळी करत चांगला प्रतिकार केला. बटलरव्यतिरिक्त राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. चेन्नईकडून या सामन्यात मोईन अलीने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर रवींद्र जाडेजा आणि सॅम करन या दोघांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तसेच शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

संबंधित बातम्या

CSK vs RR IPL 2021 Match 12 Result : राजस्थानवर 45 धावांनी मात करत चेन्नईची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप

…म्हणून पाकिस्तानी क्रिकेटर ‘स्ट्रीट स्मार्ट’ ठरतात, बाबर आझमचा VIDEO शेअर करत शोएब अख्तरकडून कौतुक

क्रिकेट चाहत्यासांठी मोठी बातमी, मुथय्या मुरलीधरनवर अँजिओप्लास्टी

(CSK vs RR, IPL 2021, MS Dhoni become 1st player to play 200 matches as captain for single IPL franchise)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.