AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?

अनाया बांगर ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्यास सज्ज झाली आहे. पण यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. असं असताना लिंगबदल करून महिला क्रिकेट खेळलेल्या क्रिकेटपटूची चर्चा रंगली आहे.

धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 26, 2026 | 4:15 PM
Share

माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या चर्चेत आहे. लिंग बदल केल्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज झाली आहे. काही अटींची पूर्तता केल्यानंतर महिला संघात खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 2023 पासून अनाया बांगर होण्याचा प्रवास सुरू झाला होता. पण या प्रवासात क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं होतं. पण आता ट्रांसजेंडर म्हणून महिला क्रिकेट खेळण्यास तयार झाली आहे. कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून तिला परवानगी मिळाली आहे. असं पहिल्यांदाच घडतंय असं नाही.. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा प्रकार घडला आहे. यापूर्वी एका क्रिकेटपटूने लिंग बदल करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला आहे. त्यामुळे आयसीसीला नियम बदलावा लागला होता. नेमकं काय प्रकरण ते समजून घेऊयात…

अनाया बांगर प्रकरणामुळे डॅनियल मॅकगेही हा क्रिकेटपटू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण लिंग बदल केल्यानंतर त्याने महिला क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. मॅकगेहीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला होता. त्याने मेलबर्नमध्ये क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. पण क्रिकेटमधील करिअर पुढे नेण्यासाठी कॅनडामध्ये शिफ्ट झाला. कॅनडामध्ये जाताच डॅनियल मॅकगेही याने स्वत:ची ओळख स्वीकारली आणि महिला म्हणून राहू लागला. त्यानंतर 2021 मध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी सुरू केली आणि महिला संघात सहभागी झाला. अल्बर्टा महिला क्रिकेट लीग आणि इंटर स्टेट क्रिकेट खेळला. डॅनियल मॅकगेहीची चांगली कामगिरी पाहून कॅनडाच्या महिला संघात स्थान मिळालं.

2022 मध्ये ब्राझीलमध्ये खेळलेल्या महिला दक्षिण अफ्रिकी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती. पण या सामन्यांना आयसीसीचा अधिकृत मान्यता नसल्याने फार काही गोंधळ उडाला नाही. पण एका वर्षानंतर आयसीसी महिला टी20 वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत डेनियल मॅकगेही याची निवड झाली आणि खऱ्या अर्थाने गोंधळ सुरू झाला. कारण ही स्पर्धा 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेशी निगडीत होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू ठरली होती. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. 4 सप्टेंबर 2023 ला ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा सामने खेळले. या दरम्यान डेनियल मॅकगेही 118 धावा केल्या.

डॅनियलच्या पदार्पणानंतर जागतिक क्रिकेटमध्ये पुरुषी शारीरिक ताकदीचा महिला क्रिकेटला फटका बसेल का? यावर मोठी चर्चा सुरू झाली. यावरून बराच वादंग झाला आणि 21 नोव्हेंबर 2023 रोजी आयसीसीने नवा नियम लागू केला. या नियमानुसार ट्रान्सजेंडर महिलांनाी पुरूषांमधील वायत येण्याचा टप्पा पार केला असेल तर त्यांना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधून बाद केलं जाईल. या नियमामुळे डॅनियलची कारकिर्द अवघ्या दोन महिन्यात संपली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही स्थानिक स्तरावर महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे