AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL 2026: पाकिस्तानी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह, डेविड वॉर्नरने केली थेट पंचांकडे तक्रार

पाकिस्तान खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा लाज घालवली आहे. बिग बॅश लीग स्पर्धेच्या 15व्या पर्वात असंच चित्र पाहायला मिळालं. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. यामुळे भर सामन्यात वादाला फोडणी मिळाली.

BBL 2026: पाकिस्तानी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह, डेविड वॉर्नरने केली थेट पंचांकडे तक्रार
BBL 2026: पाकिस्तानी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह, डेविड वॉर्नरने केली थेट पंचांकडे तक्रारImage Credit source: Getty Images
| Updated on: Jan 10, 2026 | 8:48 PM
Share

बिग बॅश लीग स्पर्धेचं 15वं पर्व सुरु आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडूही खेळत आहे. पण त्यांची कामगिरी एकदम सुमार राहिल्याचं पाहायला मिळत आहे. बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवानकडून अपेक्षाभंग झाला आहे. पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या अपेक्षेने फ्रेंचायझींनी विकत घेतलं होतं. पण त्यांच्याकडून हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे पैसे वाया गेल्याची भावना आहे. दुसरीकडे, हारिस रऊफने त्यातल्या त्यात चांगली कामगिरी केली आहे. असं सर्व गणित असताना आणखी एक पाकिस्तानी खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या स्पर्धेत एन्ट्री मारली खरी, पण त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. जमान खानच्या गोलंदाजीची शैली रडारवर आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज 10 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीटसाठी पहिला सामना खेळला. पहिल्याच सामन्यात त्याच्या गोलंदाजीची तक्रार केली गेली.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बिग बॅश लीग स्पर्धेत वेगवान गोलंदाज जमान खानच्या स्लिंगशॉट गोलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. सिडनी थंडरचा कर्णधार डेविड वॉर्नरने जमानच्या गोलंदाजीव आक्षेप घेतला. जमान खान गोलंदाजीला आला तेव्हा पहिलाच चेंडू वाइड टाकला. असं असलं तरी पहिलं षटक त्यातल्या त्यात बरं गेलं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात धुलाई झाली. तिसरं षटकं संपलं तेव्हा वॉर्नरने पंचांकडे तक्रार केली. त्याची तक्रार स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे. चार वर्षांच्या मुलासारखी गोलंदाजी असल्याचं सांगितलं. त्याचा हात खूपच खाली येत असल्याचं सांगितलं.

जमान खानला एकही विकेट मिळाला नाही. सिडनी थंडर विरूद्धच्या सामन्यात पूर्णपणे फेल गेला. ब्रिस्बेन हीटने 7 विकेटने विजय मिळवला. पण यात जमान खानचं योगदान काही खास राहिलं नाही. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडरने 180 धावा केल्या. त्यानंतर उस्मान ख्वाजाच्या मदतीने ब्रिस्बेन हीटने 16.2 षटकात लक्ष्य गाठले.

या विजयासह ब्रिस्बेन हीट पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. ब्रिस्बेन हीटचे या स्पर्धेत 4 विजय आणि 4 पराभव आहेत. सर्व विजय घरच्या मैदानावर मिळाले आहेत. त्यांचा पुढचा सामना होबार्टमध्ये गतविजेत्या संघाविरुद्ध होणार आहे. शेवटचा साखळी सामना गाब्बा येथे होईल. पुढील फेरीत पोहोचण्याचा त्यांना विश्वास असेल. दुसरीकडे, सिडनी थंडरने आता पाच सामने गमावले आहेत.

बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा.
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत.
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप.
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड.
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट.
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले...
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले....
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली.
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच.
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?.
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी...
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी....