AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं ! कसोटी सामन्यानंतर हा खेळाडू घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Ind vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिया यांच्यातील टी२० आणि वनडे मालिकेनंतर आता टेस्ट मालिका रंगणार आहे. पण या मालिकेदरम्यान एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो आता दोन शेवटचे सामने खेळणार आहे.

ठरलं ! कसोटी सामन्यानंतर हा खेळाडू घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
dean
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 22, 2023 | 1:55 PM
Share

Ind vs SA Test series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना २६ डिसेंबरला सुरु होत आहे. दोन्ही संघ यासाठी जोरदार तयारी करत आहेत. या सामन्याच्या काही दिवस आधी एका खेळाडूने या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. भारताने वनडे मालिका २-१ ने जिंकली आहे. यानंतर आता टेस्ट मालिका सुरु होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर, ज्याचा या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. डीन एल्गरनेच त्याची निवृत्तीची घोषणा केली आहे. डीन एल्गर दोन कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

डीन एल्गर हा ३६ वर्षांचा आहे. डीन एल्गर जवळपास 12 वर्षांपासून आपल्या संघासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. या काळात त्याने 80 हून अधिक कसोटी खेळल्या आणि 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने 17 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यातील अनेक सामने जिंकलेही आहेत. डीन एल्गरचे वक्तव्यही समोर आले आहे. सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो असे तो म्हणतो. भारतीय संघाविरुद्धची कसोटी मालिका त्याची शेवटची मालिका असेल.

‘क्रिकेट खेळणे स्वप्न होतं’

एल्गर म्हणाला की, आपण निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. एक खेळ ज्याने मला खूप काही दिले आहे. केप टाउन ‘जगातील माझे आवडते स्टेडियम.’ जिथे मी न्यूझीलंडविरुद्ध माझी पहिली कसोटी धाव घेतली आणि आशा आहे की माझी शेवटची असेल. एल्गर म्हणाला की, क्रिकेट खेळणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे, परंतु माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी हा एक विशेष विशेषाधिकार आहे.

डीन एल्गरने एकूण 84 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये तो 5146 धावा केले आहेत. या काळात त्याने 47.38 च्या सरासरीने आणि 47.38 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 13 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 धावा आहे, म्हणजेच तो केवळ एका धावेने द्विशतक झळकावण्यास मुकला. त्याचबरोबर त्याच्या नावावर संघासाठी फक्त आठ एकदिवसीय सामने आहेत. यामध्ये त्याने 104 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी १७.३३ आणि स्ट्राइक रेट ५८.७५ आहे. तो फक्त एक विशेषज्ञ कसोटी क्रिकेटर मानला जातो. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये डीन एल्गर कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!