IND vs SA: पराभव जिव्हारी लागला, हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी पाहा VIDEO

IND vs SA: पराभव जिव्हारी लागला, हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी पाहा VIDEO

या सामन्यात खेळणाऱ्या दीपक चहरने (Deepak Chahar) मिळालेल्या संधीच सोन केलं. त्याने ऑलराऊंडर प्रदर्शन करत बॉल बरोबर बॅटनेही कमाल केली. त्याने 34 चेंडूत 54 धावांची खेळी करुन सामन्याचा नूर पालटला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 24, 2022 | 9:30 AM

केपटाऊन: कसोटी पाठोपाठ वनडे मालिकेतही (One day Series) भारताचा दारुण पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप करत 3-0 असा विजय मिळवला. शेवटच्या वनडे मध्ये भारताचा अवघ्या चार धावांनी पराभव झाला. या सामन्यात खेळणाऱ्या दीपक चहरने (Deepak Chahar) मिळालेल्या संधीच सोन केलं. त्याने ऑलराऊंडर प्रदर्शन करत बॉल बरोबर बॅटनेही कमाल केली. त्याने 34 चेंडूत 54 धावांची खेळी करुन सामन्याचा नूर पालटला. सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. पण 48 व्या लुंगी निगीडीच्या षटकात चहर बाद झाला आणि भारताने हा सामना चार धावांनी गमावला.

या पराभवामुळे दीपक चहर भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य दिले होते. चहर बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराह (12) आणि युजवेंद्र चहल (2) पाठोपाठ बाद झाले आणि भारताचा डाव संपला.

चहरने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध मॅचविनिंग खेळी केली
दौऱ्यातील पहिलाच सामना खेळणाऱ्या दीपक चहरने करीयरमधील दुसरे अर्धशतक झळकावलं. त्याने या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. सामना संपल्यानंतर दीपक चहर निराश झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं दुश्य कॅमेऱ्याने टिपलं. कदाचित दीपक चहर टिकला असता, तर सामना भारताच्या बाजूने झुकला असता. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध दीपक चहरने आपल्या बॅटचा तडाखा दाखवला होता. त्याने मागच्यावर्षी कोलंबोमध्ये 82 चेंडूत 69 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.

“केएल राहुलने सुद्धा दीपक चहरचं कौतुक केलं. दीपकने आम्हाला सामना जिंकण्याची संधी दिली होती. खूप उत्सुक्ता निर्माण झाली होती. आम्ही सामना हरलो, त्यामुळे निराश आहोत. आम्ही यातून काही तरी शिकू आणि अजून सुधारणा करु” असे भारतीय कर्णधाराने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित बातम्या:

Shoaib Akhtar: ‘विराट कोहलीला कॅप्टनशिप सोडायला भाग पाडलं’, शोएब अख्तरचा खळबळजनक दावा
Video | कधी काळी फ्लाईंग किस जायचा, आता बॅटचाच पाळणा झाला! युजर्स म्हणाले ‘शेवटी बापाचं काळीजए!’
स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें