AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar: ‘आता दुसऱ्याचा शोध घेण्याची वेळ आली’, सुनील गावस्करांच टीम इंडियातील एका मोठ्या गोलंदाजाबद्दल वक्तव्य

पण तो गोलंदाजी विभागात चैतन्य निर्माण करु शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने 10 षटकात 64 धावा दिल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने आठ षटकात 67 धावा दिल्या पण एकही विकेट मिळवला नाही.

Sunil Gavaskar: 'आता दुसऱ्याचा शोध घेण्याची वेळ आली', सुनील गावस्करांच टीम इंडियातील एका मोठ्या गोलंदाजाबद्दल वक्तव्य
Sunil Gavaskar
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 10:13 AM
Share

मुंबई: पार्लच्या बोलँड पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar) प्रभावहीन ठरला. भुवनेश्वरने विकेटही मिळवली नाही आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना त्रास देण्याइतका त्याच्या गोलंदाजीत दमही वाटला नाही. या निराशाजनक प्रदर्शनामुळे टीम इंडियाचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांनी दीपक चाहारला संधी द्यावी, असं मत व्यक्त केलं आहे.

भुवनेश्वरने कमबॅक केलं. पण तो गोलंदाजी विभागात चैतन्य निर्माण करु शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने 10 षटकात 64 धावा दिल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने आठ षटकात 67 धावा दिल्या पण एकही विकेट मिळवला नाही. “आता दीपा चाहारकडे बघण्याची वेळ आलीय. तरुण आहे, चांगली गोलंदाजी करतो व उपयुक्त फलंदाजी सुद्धा करु शकतो” असे गावस्कर म्हणाले.

“भुवनेश्वर कुमारने भारतीय क्रिकेटमध्ये उत्तम योगदान दिलय. पण मागच्यावर्षी आणि आता तसंच आयपीएल टी-20 मध्येही तो महागडा गोलंदाज ठरला. सुरुवातीच्या षटकांमध्ये नाही पण अखेरच्या षटकांमध्ये त्याने धावा दिल्या. उत्तम यॉर्कर आणि स्लो बॉल टाकण्याची त्याची क्षमता आहे. पण आता त्याची ती गोलंदाजी सुद्धा चालत नाहीय. प्रतिस्पर्धी संघ तुमचा अभ्यास करुन उतरतो, तेव्हा असं घडतं. अशा प्रकारची गोलंदाजी कशी खेळायची हे त्यांना माहित असतं. त्यामुळे आता दुसऱ्या गोलंदाजाचा शोध घेण्याची वेळ आलीय” असं मत गावस्करांनी व्यक्त केलं. आज तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर ऐवजी दीपक चाहारला संधी मिळू शकते.

‘It’s time to look at somebody else’ Gavaskar wants senior India pacer replaced

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.