स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’

स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली 'फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या'
mithali-raj

वर्ल्डकपच्या आधी (ICC Women World Cup) मितालीला जेव्हा यावरुन प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती भडकली. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेआधी यजमान देशाविरुद्ध वनडे मालिकाही खेळायची आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 24, 2022 | 7:38 AM

मुंबई: भारताच्या वनडे संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) मागच्या काही दिवसांपासून स्ट्राइक रेटच्या मुद्यावरुन टीकेचा सामना करतेय. वर्ल्डकपच्या आधी (ICC Women World Cup) मितालीला जेव्हा यावरुन प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती भडकली. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेआधी यजमान देशाविरुद्ध वनडे मालिकाही खेळायची आहे. भारतीय महिला संघ लवकरच या मालिकेसाठी रवाना होणार आहे. दौऱ्यावर रवाना होण्याआधी मिताली राज आणि कोच रमेश पवार (Ramesh pawar)यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाच्या तयारीची माहिती दिली.

मिताली राजला आज टीमच्या स्ट्राइक रेटवरुन प्रश्न विचारण्यात आला. स्ट्राइक रेट चांगला नाहीय. ऑस्ट्रेलिया सीरीजनंतर स्ट्राइक रेट वाढवण्यासाठी काम केलय का? त्याकडे तुम्ही लक्ष देताय का? असा प्रश्न विचारण्यात आला. मिताली राजला हा प्रश्न आवडला नाही. ती या प्रश्नावर वैतागल्याचं दिसलं. “तुम्ही फक्त आमच्या संघाच्या स्ट्राइक रेटबद्दल बोलता, तुम्हाला इतर संघांचा स्ट्राइक रेट माहित आहे का?” असा प्रतिप्रश्न केला.

टीम इंडिया फक्त स्ट्राइक रेटवर लक्ष देत नाही
वनडे मध्ये मितालीचा स्ट्राइक रेट 50 च्या आसपास आहे. धीम्या गतीने फलंदाजी केल्याबद्दल तिच्यावर बऱ्याचदा टीकाही झाली आहे. त्यात पुन्हा एकदा तिला त्याच मुद्यावरुन प्रश्न विचारताच ती भडकली. “तुम्ही लोक स्ट्राइक रेटला खूप महत्त्व देता. तुम्ही इतर संघांचा स्ट्राइक रेटही बघितला पाहिजे. ऑस्ट्रेलिया सीरीजबद्दल बोलायच झाल्यास, निर्णायक सामन्यात बेथ मूनीने 80 चेंडूत 50 धावा केल्या. मॅच जिंकवून देणारी ती इनिंग ठरली. क्रिकेट एक असा खेळ आहे, जो स्ट्राइक रेट नाही, परिस्थिती पाहून खेळला जातो. आम्ही स्ट्राइक रेटवर लक्ष देतोय, पण त्याआधी सामना कसा जिंकायचा ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे” असं मिताली राज म्हणाली.

“जेव्हा आम्हाला 250-270 धावा करायच्या असतात, तेव्हा चांगला स्ट्राइक रेट आवश्यक आहे. म्हणून फक्त त्यावरच लक्ष देऊन चालणार नाही. भागीदाऱ्या करायच्या, संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढायचा असा आमचा प्रयत्न असतो” असे मितालीने सांगितले.

संबंधित बातम्या:
वनडे मध्ये भारतापेक्षा झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडची चांगली गोलंदाजी, विश्वास नसेल तर हे आकडे पाहा
Shoaib Akhtar: ‘विराट कोहलीला कॅप्टनशिप सोडायला भाग पाडलं’, शोएब अख्तरचा खळबळजनक दावा
Sunil Gavaskar: ‘आता दुसऱ्याचा शोध घेण्याची वेळ आली’, सुनील गावस्करांच टीम इंडियातील एका मोठ्या गोलंदाजाबद्दल वक्तव्य

icc women world cup mithali raj aggressive answer on her slow strike rate

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें